
समांतर क्रांती / बेळगाव
Minister Hebbalkar’s vehicle accident महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला आज मंगळवारी (ता.१४) पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला. त्यात मंत्री हेब्बाळकर यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी हे जखमी झाले आहेत.
मंत्र्यांच्या वाहनापुढे एस्कॉर्ट असते, मग हा अपघात कसा झाला? एस्कॉर्ट करणारे वाहन मंत्र्यांच्या वाहनाच्या पुढे असते. कुत्रा आडवा आला असेल तर एस्कॉर्टच्या वाहनाचा अपघात झाला असता, मंत्र्यांचे वाहन महामार्ग सोडून सेवा रस्त्यावर (सर्व्हीस रोड) कसे गेले? मंत्री हेब्बाळकर यांच्या वाहनापुढे एस्कॉर्ट वाहन होते की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
काल सोमवारी (ता.१३) बंगळूर येथे प्रदेश काँग्रेसची महत्वाची मिटींग होती. शिवाय मंत्रीमंडळाची सुध्दा बैठक झाली. या दोन्ही बैठकींत सहभागी होऊन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या बंगळूरहून बेळगावकडे येत होत्या. दरम्यान, पहाटे कित्तूर तालुक्यातील आंबडगट्टीजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रे आल्यामुळे त्याला वाचवतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
मंत्र्यांचे वाहन झाडावर आदळल्यानंतर वाहनातील सहा सर्व एअर बॅग बाहेर पडल्याने सुदैवाने जिवीतहानी टळली. पण, मंत्री हेब्बाळकर यांच्या पाठीतील दोन महत्वाची हाडे फॅक्चर झाल्याचे हॉस्पिटल सुत्रांनी स्पष्ट केले आहे. आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या डोकीला दुखापत झाली असून दोघांवरही बेळगावातील विजया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मंत्र्यांच्या वाहनापुढे एस्कॉर्ट नव्हते का?
मंत्री हेब्बाळकर या त्यांच्या सरकारी वाहनातूनच प्रवास करीत होत्या. त्या वाहनापुढे एस्कॉर्ट वाहन होते, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. पण, आंबडगट्टीजवळ एस्कॉर्ट वाहन त्यांच्या वाहनापासून बरेच अंतर दूर होते. यादरम्यान, मंत्र्यांच्या वाहनासमोर एक मालवाहू कंटेनर आला. त्याला चुकवत असतांनाच कुत्रा वाहनासमोर आला. त्यामुळे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन कंटेनरला आदळेल या भितीतून चालकांने वाहन सेवा रस्त्यावर घेतले. पण, वाहन रस्त्याकडेला जात झाडाला आदळले. त्यात वाहनाच्या दर्शनी भाग चक्काचूर झाला आहे. जखमी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे.
कंटेनर मध्ये कसा आला?
पोलिस अधिक्षकांनी केलेल्या दाव्यानुसार एस्कॉर्ट वाहन होते, तर ते मंत्र्यांच्या वाहनापासून दूर का होते. तसेच दोन्ही वाहनांच्या मध्ये कंटेनर कसा आला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या एकुण परिस्थितीचा तपास पोलिस खात्याकडून केला जात आहे. मंत्री हेब्बाळकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
खानापूर शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘कारभार’ शिक्षकाकडे…गुरुजी जरा लक्ष द्या की..
समांतर क्रांती / खानापूर राजश्री कुडची या निवृत्त झाल्यानंतर खानापूरच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कार्यभार समूह संपन्मूल अधिकारी अशोक अंबगी यांच्याकडे आला आहे. मात्र, नेहमीप्रमाणचे कार्यालयाचा ‘कारभार’ बहुचर्चीत शिक्षकाकडेच आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अंदाधुंदी माजली असून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे. तर कांही दलाल शिक्षकांची मात्र चंगळ चालली आहे. स्वत: या क्षेत्रात कार्यरत राहून […]