वेंकटेश हेगडे यांचा आरोप; शिरसी दुर्गम राहण्यास तेच कारणीभूत
शिरसी: भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शिक्षणमंत्री असतांना आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्याच्या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रधान सचीव वेंकटेश हेगडे- होसबाळे यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जगदीश गौडा, महिला अध्यक्षा गिता शेट्टी, जिल्हा माध्यम संयोजिका ज्योती पाटील, दीपक हेगडे-दोड्डूर, अब्बास तोन्से, तारा मेस्त, मंगल मेस्त, रम्या चंदावर, रमेश दुभाषी, खादर अनवट्टी आदी उपस्थित होते.
ते पुढे बोलतांना म्हणाले, शिरसी विधानसभा मतदार संघ दुर्गम राहण्यास केवळ आणि केवळ विश्वेश्वर हेगडे हेच जबाबदार आहेत. ते राज्याच्या विधीमंडळात मोठ्या स्थानावर पोहचले मात्र त्यांनी मतदार संघाकडे साफ दुर्लक्ष केले. साधी नळपाणी योजनादेखील त्यांना व्यवस्थीतपणे राबविता आलेली नाही. कुंबरी जमिनींची समस्या २०१३ पासून सुरू झाली. त्याकाळात हेच कागेरी आमदार होते, त्यांनी पिडीत जनतेसाठी काय केले? असा सवालही वेंकटेश हेगडे यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या पाच गॅरंटींची अंमलबजावणी होत नसल्याचे कागेरी सांगत फिरत आहेत. त्यांनी प्रचार सभेत त्यांच्याच कायथकर्त्यांना वीज बिल किती भरता? तुमच्या पत्नींना महिन्याला सरकारकडून किती रुपये मिळतात? प्रवास मोफत आहे की नाही? असे प्रश्न विचारून खातरजमा करून घ्यावी. हे काँग्रेसचे सरकार आहे, खोटारडेपणा करणारे भाजपचे सरकार नाही, हे लक्षात ठेवून बोलावे, असेही त्यांनी ठणकावले. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आणखी महत्वाकांक्षी योजना लागू केल्या जातील, ज्यांचा फायदा उद्योजकांना नाही तर सर्वसामान्य जनतेला होईल, असेही वेंकटेश हेगडे म्हणाले.
ज्यांना त्यांच्या घरच्या मतदार संघातून विरोध आहे, ते विश्वेश्वर हेगडे खासदार बनायची स्वप्न पाहत आहेत. सहा वेळा आमदार होऊनही ज्यांना त्यांच्या मतदार संघाचा विकास करता आला नाही ते आता जिल्ह्याच्या विकासाच्या बाता मारीत आहेत. त्यांना एकही मत देऊ नका, शिरसीवासीय फसलेत इतरांनी फसगत करून घेऊ नये, असे आवाहन वेंकटेश हेगडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केले.
खूप झालं, आता बदल आवश्यकच!
मणतुर्गा येथील सभेत ईश्वर बोबाटे गरजले; ॲड, घाडी, बिर्जे आणि मुतगेकरांनी डागली तोफ खानापूर: गेल्या तीस वर्षांपासून भाजप तालुक्यातील लोकांना नागवीत आहे, आता खूप झालं. त्यामुळेच आम्ही काँग्रेसच्या सोबत समर्थपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आपल्या तालुक्यातील उमेदवार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच विजयी करायचं हे ठरलंय, जनतेनेदेखील डॉ. बनंबाळकर यांनाच विजयी करण्यासा चंग […]