समांतर क्रांती / खानापूर
पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी मंजुनाथ नाईक समर्थकांनी केली आहे. यासंदर्भात आज गुरुवारी (ता. 26) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात, पोलिस निरीक्षक नाईक हे प्रामाणिक अधिकारी आहेत.भाजपचे आमदार सी. टी. रवी यांना अटक करून खानापूरात आणले होते. त्यावेळी नाईक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भाजपच्या नेत्यांना पोलिस स्थानकात प्रवेश दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. भाजप नेत्यांचा पोलिस स्थानकातील फोटो व्हायरल झाला होता, त्यावरून ही कारवाई केली गेली आहे. प्रत्यक्षात नाईक यांनी त्यांचे कर्तव्यच केले होते. कारण आमदार रवी हे माजी मंत्री असून त्यांना भाजपचे नेते भेटायला जाणे हे चुकीचे नव्हते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय सुडापोटी पोलिस अधिकाऱ्यांनी नाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांचे निलंबन विनाविलंब रद्द करावे, अशी मागणी उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षकाना तहसीलदारतर्फे देण्यात आले आहे.
यावेळी भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा प्रधान सचिव धनश्री सरदेसाई -जांबोटीकर, पंडित ओगले, राजू रायका, गुंडू तोपिनकट्टी,किशोर हेब्बाळकर, बाबा देसाई यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दलित संघटनांचे सोमवारी निवेदन
दरम्यान, पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे निलंबन रद्द करावे यासाठी दलित संघटनानी सुद्धा पुढाकार घेतला आहे. सोमवारी यासंदर्भात निवेदन सादर करणार असल्याचे दलित नेते दशरथ बनोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करवे, भीमसेनासह इतर दलित संघटना यावेळी मोर्चात सहभागी होणार आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधनदिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर प्रारंभी घरीच उपचार करण्यात आले पण त्याचा उपयोग ना झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री […]