समांतर क्रांती / बेळगाव
बिम्समध्ये नवजात बाळाला सोडून पळालेल्या बिबीजान सद्दाम हुसेन सय्यद हिला अटल करून न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. शुक्रवारी तिच्यावर एपीएमसी पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज शनिवारी (ता. १४) तिला अटक करण्यात आली.
बैलहोंगल येथील बिबिजान हिला प्रसूतीसाठी मागील शनिवारी (ता. ८) बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने मुलीला जन्म दिला होता. पण, अचानक तिने नवजात बालकाला सोडून पळ काढला होता. नवजात मुलीवर उपचार सुरू होते. पण त्याचा उपयोग न झाल्याने तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात बिबीजान हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
एपीएमसी पोलीसांनी आज शनिवारी तिला बैलहोंगल येथून अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नवजात बालकाला सोडून ती का पळाली? याचे कारण समजू शकले नाही.
तलावात बुडून तरूणाचा मृत्यू ; खानापूर तालुक्यातील घटना
समांतर क्रांती / नंदगड खानापूर तालुक्यातील हंदूर येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१४) घडली. या घटनेत माबुली हसनसाब काद्रोळी असे या घटनेत मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, माबुली हा आज सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गावापासून जवळच असणाऱ्या तालवाकडे गेला होता. तो दुपार उलटून गेली तरी घरी […]