समांतर क्रांती वृत्त
पणजी: डिचोली संगम सेतुजवळ बेळगाव (कर्नाटक) येथील रमेश गवळी (वय ३५) याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रमेश गवळी याचा मृतदेह सकाळी पुलाखाली आढळून आला. त्याच्या अंगावर सुरीने खुपसल्याचे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हा खुनच असल्याचे स्पष्ट झाल्याने डिचोली पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. रमेश हा बेलगावमधील कुठला हे समजले नसले तरी तो स्क्रॅप गोळा करण्याचे काम करीत होता, असे सांगण्यात येत आहे.
खानापूरही दुष्काळग्रस्त जाहीर करा
समांतर क्रांती वृत्तखानापूर: दुष्काळग्रस्त तालुक्यातून खानापूरला वगळण्यात आले असून त्याबाबत फेरविचार व्हावा आणि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी खानापूर तालुका म.ए.समितीने केली आहे. यासंदर्भात बुधवारी तःशीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्यासह समितीचे पदाधिकारी […]