मुरलीधर पाटील म.ए. समितीचे उमेदवार
खानापूर: तालुका म.ए. समितीने भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी ही घोषणा केली.
समितीकडे पाच इच्छुकांनी अर्ज दिले होते. शुक्रवारी (ता.०७) या पाचही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान,मतदानाद्वारे उमेदवार निवडीचा निर्णय घेण्यात आला. विलास बेळगावकर यांनी मतदानाद्वारे निवड करण्यास विरोध करीत ते बाहेर पडले होते. त्यामुळे चौघा इच्छुकांसाठी आज शनिवारी मतदान झाले त्यात मुरलीधर पाटील यांना बहुमत मिळाल्याने त्यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. घोषणेनंतर त्यांच्या पाठीशी ठाम राहून समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार इतर इच्छुकांनी व्यक्त केला.
I want to to thank you for this very good read!! I certainly enjoyed every little bit of it. I have got you book-marked to check out new stuff you postÖ