समांतर क्रांती / खानापूर
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांनी हॅटट्रीक साधली आहे. खानापूर भूविकास बँकेवर चौथ्यांदा निवडून गेलेले मुरलीधर पाटील यांना सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आज झालेल्या निवडणूकीत त्यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी आमटे ग्रा. पं. माजी अध्यक्ष लक्ष्मण घेमा कसर्लेकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर संचालक व त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले.
नुकताच झालेल्या बँकेच्या निवडणुकीत १५ पैकी १३ संचालकांची अविरोध निवड झाली होती. तर दोन जागांसाठी निवडणूक झाली होती. सोमवारी (ता.०६) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार होती. दरम्यान, सर्वच संचालकांनी मुरलीधर पाटील यांना समर्थन दिल्याने त्यांची अध्यक्षपादी अविरोध निवड झाली. ते चौथ्यांदा बँकेचे संचालक राहिले तर गेल्या दहा वर्षांपासून बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांची पुन्हा निवड झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाची हॅटट्रीक साधली आहे.
यावेळी अशोक बाबू पाटील (चिकदिनकोप्प), सुदीप बसनगौडा पाटील (इटगी), नारायण नागाप्पा पाटील (बिजगर्णी), सुभाष निंगाप्पा गुरव (हलशी), लक्ष्मी शिवाप्पा पाटील (तिओली), सुलभा धनाजी आंबेवाडकर, सुनिल विठ्ठल चोपडे (माळ अंकले), कुतुबुद्दीन उस्मानसाब बिच्चन्नावर, यमनाप्पा चंदप्पा राठोड, श्रीकांत सहदेव करजगी, शंकर विष्णू सडेकर-जांबोटीकर, निळकंठ गुंजीकर व विरुपाक्षी पाटील (बरगाव) आदी संचालक उपस्थित होते.
अरविंद पाटील यांची खासदारांशी तालुक्यातील समस्यांवर चर्चा
समांतर क्रांती / खानापूर खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आज मंगळवारी (ता.७) खानापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामधामात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी खासदार हेगडे-कागेरी यांच्याकडे तालुक्यातील विविध समस्या मांडल्या. तसेच ग्रामिण भागातून आलेल्या नागरीकांची कैफीयत मांडून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत विनंती केली. खानापूर तालुक्यातील दुर्गम […]