नंदगड : समांतर क्रांती न्यूज
पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नंदगड येथे भव्य शिवस्फूर्ती स्थळ उभारण्याचा निर्णय आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. या शिवस्फूर्ती स्थळावर भव्य असा सिंहासणाधिस्थित छ. शिवारायांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदगड येथील ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा भरणार आहे. तत्पूर्वी शिवस्फूर्ती स्थळाचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी बेळगाव अनगोळ येथील मूर्तिकार अमृत पाटील यांना शिवपुतळा निर्मितीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. सदर पुतळा पूर्णतः ब्रांझचा असेल अशी माहिती शिवस्फूर्ती विकास संघांचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली. नंदगड येथील शिवपुतळा भव्यदिव्य असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजी माजी सैनिकांसह ग्रामस्थांनी या निर्धाराला पाठिंबा दर्शवीला असून मोठ्या प्रमाणात देणग्यांचा ओघ सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. गावाच्या वैभवात हे शिवस्फूर्ती स्थळ भर घालेल, असे सामाजिक कार्यकर्ते गुंडू हलशीकर यांनी सांगितले. यावेळी राजू पाटील, भरमानी सांगोलकर, यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव आदी उपस्थित होते.
चापगावात राजकारण तापले ; 'अविश्वासाचा चेंडू उच्च न्यायालयात
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील चापगाव ग्राम पंचायतीचे राजकारण सध्या तापले आहे. सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षावर अविश्वास ठराव समंत करण्याचा प्रयत्न केला, पण उच्च न्यायालयाने आजच्या (04) विशेष बैठकीला स्थगिती आदेश बजावल्याने सदस्यांचा हिरमोड झाला आहे. अध्यक्षा गंगव्वा कुरबर आणि उपध्यक्षा मालुबाई पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यासाठी आज विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. […]