
समांतर क्रांती / खानापूर
नंदगड येथील नागरीकांसह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी माजी आमदार तथा राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट घेऊन गावातील समस्यांचा पाढा वाचला. यात्रा आवघ्या पंधरा दिवसांवर असतांना अजुनही अनेक समस्या जशास तशाच आहेत. त्या सोडवून यात्रा काळात होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
नंदगडात विकास कामांसाठी निधी नाही. आमदारांनी फक्त ५ लाखांचा निधी आमदार फंडातून दिला आहे, त्यातून कांहीच शक्य नाही. यात्रेसाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी, आमदार-खासदारांच्या बैठकीच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. त्यामुळे कांही अडचण नसेल, असे वाटले होते. पण, तुमच्याकडून समस्यांबद्दल ऐकून खेद वाटला असे सांगितले. यात्रेसाठी सरकारदरबारी प्रयत्न करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच घाबरू नका, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला. त्यांनी तात्काळ पंचायत विकास अधिकाऱ्यांशी बोलून कामांचा आढावा घतेला.
उद्या त्या नंदगड गावास भेट देऊन कामांची पाहणी करणार आहेत, असे त्यांनी अधिकाऱ्यांना कळविले आहे. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रा.पं. अध्यक्ष यलाप्पा गुरव, कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष महांतेश रांऊत, शंकर सोनोळी, वैष्णवी पाटील, नागो पाटील, मन्सूर तहसिलदार, रोहीत गुरव, मष्णू कुंभार्डेकर, राजू कब्बूर, नागाप्पा देसुरकर, तुकाराम गावडा, शिवाजी पाटील, तुकाराम गावडा, हणमंत किनयेकर आदी उपस्थित होते.
हळदी-कुंकू हा नारीशक्तीचा सन्मान: अरूंधती दळवी
समांतर क्रांती / खानापूर हळदी-कुंकू हा हिंदुच्या परंपरेतील महत्वाचा कार्यक्रम आहे. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना त्यांच्या नेहमीच्या धबागड्यातून विरंगुळा मिळतो. शिवाय त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. मणतुर्गा येथील ग्रामस्थ, पंच कमिटी व देव रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटीने ही संधी येथील महिलांना देऊन एकप्रकारे नारीशक्तीचा मानसन्मान करीत आदर्श निर्माण केलेला आहे, असे मत निवृत्त […]