समांतर क्रांती वृत्त
खानापूर: नाथाजीरावांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे. केवळ शून्यातून स्वप्नवत विश्व निर्माण करण्याची किमया त्यांच्या कार्यामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेने साधली आहे. कर्नाटकात नावाजलेल्या संस्थांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा मान नाथाजीरावांच्या अचाट कर्तृत्वामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेला मिळाला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वावर जगत स्वतःला संस्थेच्या कार्यात समर्पित करत सतत संस्थेच्या हितासाठी झटणारा हा आवलिया सीमाभागातील शिक्षण महर्षी म्हणून गणला गेला. त्यांचे हे कार्य चंद्र-सूर्य असे पर्यंत अमर राहील, असे गौरवोद्गार प्रा. जे. बी. अंची यांनी काढले. मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर महाविद्यालयात कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी होत्या.
अध्यक्ष या नात्याने बोलताना प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी म्हणाल्या “केवळ एकशे सहा रुपये संस्थेची शिल्लक असताना संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारणे नाथाजीरावांचे मोठे धाडसच होते. मात्र काहीतरी अदिम निर्माण करण्याच्या इच्छेतून नाथाजीरावांनी ‘निश्चयाचा महामेरू’ मोठ्या प्रयासाने सत्यात उतरविला. त्यामुळेच करंबळ, बेकवाड, कापोली, गुंजी, कान्सुली यासारख्या दुर्गम भागातील गावांमध्ये ज्ञानगंगा पोहोचविली आणि खानापूर तालुक्यात पहिले महाविद्यालय सुरू करण्याचा मान मराठा मंडळ या संस्थेला मिळवून दिला.”
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. डॉ. आय. एम. गुरव यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुनंदा कुर्णी यांनी केले. व्यासपीठावर महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी कु. माहेश्वरी नांदुडकर, सांस्कृतिक विभाग सचिव कु. प्रीती पाटील उपस्थित होत्या. तर कु. श्रेया व कु. लीला ओसापाचे या विद्यार्थिनींनी गीत गायन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे जनहित व जनजागृती कार्यक्रम
खानापूर: कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री.बनोशी आणि प्रमुख पाहुणे तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक चांगाप्पा निलजकर, अरविंद कुलकर्णी, सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड यांच्या […]