
समांतर क्रांती / खानापूर
बोगस पासचा वापर करून निलगिरीच्या लाकडांची तस्करी करणारा एक ट्रक नंदगड पोलिसांनी जप्त केला आहे. नंदगड येथील मोहमद्द इक्बाल मोहमद्दगौस मिरजकर (रायापूर-नंदगड) हे त्यांच्या ट्रकमधून निलगिरीची वाहतूक करीत होते. तर त्यांना ओलमणी येथील इसमाने सदर पास दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
मोहमद्द इक्बाल हे निलगिरी लाकूड भरून जात असतांना संशयावरून तपासणी केली असता बोगस पासचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी नंदगड पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर सदर ट्रक लाकडासह जप्त करण्यात आला आहे. निलगिरीचे लाकूड नंदगड पोलिस स्थानक हद्दीतील झुंजवाड (केएन) येथील असून बोगस पासच्या आधारे ही तस्करी चालली होती. गेल्या कांही दिवसांपासून ही फसवणूक चालली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिक तपास सुरू आहे.

जत्रा करतंय नंदगड, विकासाची सगळी भानगड..
समांतर क्रांती / खानापूर नंदगड येथील महालक्ष्मी यात्रोत्सव आवघ्या महिनाभरावर येऊन ठपली आहे. आमदार, माजी आमदारांनी गावातील समस्या सोडवून वेळेत विकास कामे पूर्ण करण्याची सूचना केली होती. पण, पंचायतीने त्यांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. यात नागरीकांची परवड होत असून चिंता वाढली आहे. तब्बल २४ वर्षांनी नंदगडात यात्रा भरणार आहे. या यात्रेला सुमारे दीड लाख […]