कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद लवकरच भूमिका मांडणार
निपाणी : माजी आमदार प्रा सुभाष जोशी यांच्यां नेतृत्वत गेली ३० वर्षे आम्ही कार्य करत आहोत पण यंदा प्रा. सुभाष जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना गृहीत धरून आपली भूमिका जाहीर केली आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने आम्ही प्रा. जोशी यांच्या गटातून बाहेर पडत आहे. अशी माहिती निपाणी येथील सरप्रेमी कार्यकर्त्यांनी दिली.यावेळी विनोद साळुंखे, पिंतुभाऊ मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
विनोद साळुंखे म्हणाले की, प्रा. जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३० वर्षे आम्ही काम करत आहे. सरांनी २००८ पर्यंत स्वतः निवडणूक लढवली अशावेळी आम्ही सोबत होतो. २०१३ साली सरांनी आमदार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा दिला यावेळीही आम्ही सर्वांनी सरांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. व शशिकला जोल्ले यांच्या विजयासाठी प्रयत्न करून केले. २०१८ साली परत जोल्ले यांच्याशी फारकत घेत माजी आमदार काकासाहेब पाटील यांना पाठिंबा दिला. यामुळे आम्हीही काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी राहिलो पण यंदा पुन्हा सरांनी काकासाहेब पाटील यांच्याशी फारकत घेत उत्तम पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांचा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. पण याबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांना सरांनी विचारात घेतलेले नाही. कार्यकर्त्यांना गृहीत धरणे ही सरांची भूमिका न पटल्याने सर्व निष्ठावंत कार्यकर्ते सरांच्या राजकीय भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत आहोत. निपाणी शहर, उपनगर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आज सरांच्या भूमिकेवर नाराज असून येत्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन सरप्रेमी कार्यकर्ते पुढची भूमिका लवकरच जाहीर करणार आहे.
यावेळी इंद्रजित जमादार, दिलीप कांबळे, सचिन थोरवत, वसीम मुजावर, मोहसिन पटेल यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
जांबोटी-चोर्ला मार्गावरील हजारो झाडांची होणार कत्तल
खानापूर: वृक्ष तोडीमुळे खानापूर-रामनगर महामार्गाचे काम वादात सापडले असतानाच आता जांबोटी-चोर्ला दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. नुकताच तोडल्या जाणाऱ्या झाडांची आरेखन करण्यात आले असून पर्यावरण प्रेमींकडून वृक्ष तोडीस विरोध होत आहे.गोव्याला जोडणाऱ्या खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदारीकरणासाठी सुमारे ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती. त्यामुळे हा वाद उच्च न्यायालयात जाऊन महामार्गाचे […]