खानापूर: निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५,दोघेही रा.बाबली गल्ली, अनगोळ-बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, योगेश हा अनगोळमधील सार्थक फोटो स्टुडिओचा मालक असून तो त्यांच्या नातेवाईकासह बेकवाड येथील लग्नाला गेला होता. बेळगावला परततांना निट्टूरजवळ खानापूर-बेळगाव महामार्गावर त्यांच्या दुचाकीची कठड्याला धडक बसली. दुचाकी भरधाव होती. त्यामुळे योगेश याच्या डोकीला जबर मार बसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जखमीला तात्काळ बेळगाव येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिकंदर शेखकडून विशाल भोंडुला अस्मान
खानापूर: तालुका कुस्तीगीर संघटनेने आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महान भारत केसरी सिकंदर शेखने (मोहोळ) हरयाणा केसरी विशाल भोंडू याला दुहेरी पट काढत अस्मान दाखविले. रात्री सव्वानऊ वाजता लागलेल्या या कुस्तीचा निकाल आवघ्या तेरा मिनिटात लागला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत संदिप मोटे (सांगली) याने मुधोळच्या सुनिल फडतरेचा पोकळ घिस्सा डावावर पराभव करून कुस्तीशौकीनांची वाहवा मिळविली. तिसऱ्या क्रमांकाच्या […]