समांतर क्रांती / खानापूर
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा उपचारदरम्यान आज सोमवारी (ता. 6) मृत्यू झाला.
काल रविवारी (ता. 5) सायंकाळी पाच वाजता खानापूर -बेळगाव महामार्गावर गणेबैलजवळ हा अपघात घडला होता. यात दोन तरुण जखमी झाले होते. त्यापैकी विक्रम मारुती पाटील (33,रा. बहाद्दरवाडी, बेळगाव) याचे आज उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगी, भाऊ बहीण असा परिवार आहे.
या घटनेत अतुल चंद्रकांत पाटील हादेखील जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडी करीत आहेत.
हलशीचे माजी ग्रा.पं. सदस्य दुचाकीसह तलावात बुडाले
समांतर क्रांती / नंदगडदुचाकीसह तलावात बुडून माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना हलशी येथे आज सोमवारी (ता.6) उघडकीस आली. इशांत अंतोन फिगेर (वय 52) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास सुरु आहे. इशांत हे शनिवारी (ता. 4) हलशीवाडीला गेले होते. रात्री ते हळशीला परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते […]