कुणबी समाजाच्या समस्या संसदेत मांडणार: डॉ. अंजली निंबाळकर
खानापूर ब्यूरो न्यूज
उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना मराठा समाजाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे युवा नेते रोहीत साठे यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे विरोधक भाजपचे नेते चांगलेच हडबडले आहेत. कारण, उत्तर कन्नड मतदार संघातील खानापूर, कित्तूर, हल्याळ, जोयडा, कारवारसह सर्वच विधानसभा मतदार संघात मराठा समाज विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या पाठिंब्याने डॉ. निंबाळकर यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.
राज्य आणि जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या मराठा संघटनांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांनाच निवडून देत समाजाच्या समस्या सोडवून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. छत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यावेळी म्हणाले, आम्ही छ.शिवरायांच्या हिंदुत्वाचा व्यापक विचारांचा पुरस्कार करतो. भाजपचे हिंदुत्व तकलादू आणि राजकीय स्वार्थापोटी आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. आमचे हिंदुत्व सर्व समाजांना एकत्र घेऊन जाणारे आणि समाजात सर्वधर्म समभाव जोपासणारे आहे.
यावेळी रोहीत साठे यांनी, काँग्रेसने यावेळी मराठा समाजाला संधी दिली आहे. त्यासाठी काँग्रेसचे आभार. मराठा समाजातील तमाम जनतेने पक्षभेद विसरून डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठिशी उभे राहत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देत मराठा समाजातील खासदार संसदेत पाठवावा, असे आवाहन केले.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी, छत्रिय मराठा परिषदेचे सचीव नितीन पवार, बिदरचे नारायण गणेश, जमखंडीचे रायबा जाधव, सतिश सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष हरिष निंबाळकर, रमेश पाटील, सीताराम बेडरे, आपय्या गुरव, प्रमोद गुंजीकर, सुनिल पाटील, यशवंत बिर्जे, चांगाप्पा पाटील, प्रकाश गावडे, गणपती गावडे आदी उपस्थित होते.
- कुणबी समाजाला न्याय मिळवून देणार: डॉ. निंबाळकर
- खानापूर, कारवार, हल्याळ, जोयडा, दांडेली या भागात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे. हा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. अनुसूचीत जातीमध्ये या समाजाचा समावेश करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. संसदेत गेल्यानंतर मी या दुर्लक्षित समाजाच्या समस्या संसदेत मांडून या समाजाला न्याय मिळवून देणार आहे, अशी ग्वाही डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली आहे.
..तर काळे झेंडे दाखविणारच; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा
‘समांतर क्रांती’च्या वृत्ताची खानापूर समितीकडून दखल खानापूर: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात भाजपचा प्रचार करण्यासाठी खानापुरात आल्यास नाईलाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा तालुका समितीने दिला आहे. यासंदर्भात मंत्री संभूराजे देसाईंना पत्र पाठविण्यात आले असल्याचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे खानापुरात येणार असल्याची माहिती […]