पणजी: मराठी असे आमुची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी आझाद भवन पर्वरी येथील सभागृहात मराठी राजभाषा संमेलन होत आहे.
महाकवी सुधाकर गायधनी हे संमेलनांचे उद्घाटक तर दिग्गज ज्येष्ठ साहित्यिक. गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. प्रकाश भगत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, पूर्णिमा देसाई या कार्याध्यक्षा तर प्रदीप घाडी आमोणकर हे प्रमुख कार्यवाह आहेत.
सकाळी ८.३० वाजता श्री. सातेरी महामाया दिंडी पथक दिंडी प्रमुख सौ विद्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी मिरवणुकीतून संमेलनाचा शुभारंभ होईल. ९.३० वाजता उद्घाटन कार्यक्रम होईल. उद्घाटनसत्रानंतर ‘मराठी राजभाषा व गोव्याचे भवितव्य’ तसेच ‘अभिव्यक्तीचा आविष्कार आणि आम्ही युवक ‘ या विषयावर अनुक्रमे डॉ. विठ्ठल ठाकूर व विजय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिकांचा सहभाग असेल. नंतर मराठी असे आमुची मायबोली या काव्य संमेलनात ज्येष्ठ कवी देविदास फुलारी अध्यक्षपद भुषवतील. संमेलन समारोप समारंभात काव्य स्पर्धेची बक्षिसे वितरण केली जातील. गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर ठराव वाचन करतील. अशोक घाडी यांच्या आभार प्रदर्शनाने संमेलनाची सांगता होईल.
म.ए.समितीचा फायदा कुणाला होणार? काँग्रेस की भाजपला?
समांतर क्रांती विशेष कधीकाळी प्रो-काँग्रेस असलेल्या खानापूरच्या म.ए.समितीचे २००८ नंतरच्या सुमारास प्रो-भाजप असे रुपांतर झाले. समितीची शकले होत असलेला हा काळ. साहजिकच मराठी भाषीक तरूणच नाही, तर नेतेसुध्दा भाजपच्या वळचणीला बांधले गेले. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्तर कन्नड लोकसभेची निवडणूक लढविली जात आहे. अशावेळी समितीचा उमेदवार विजयी होणार का? याहून समितीचा उमेदवार कुणाची मते खाणार? याबाबत […]