आबांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करणार
बेळगाव: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर.पाटील उर्फ आबांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांचे सुपुत्र आमदार रोहीत पाटील यांनी खानापूर म.ए.समितीच्या शिष्ठमंडळाला दिली. येथील युवा समितीने आज रविवारी (ता.१२) आयोजीत केलेल्या युवादिनाच्या कार्यक्रमाला आमदार रोहीत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. दिवंगत आर. आर. पाटील यांनी […]