अखेर घननीळ बरसला..
खानापूर: गेल्या आठ दिवसांपासून सायंकाळी आभाळ दाटून येत होते. कांही काळ विजांचा कटकडाटही होत असे. पण, चातकाप्रमाणेच पावसाची वाट पाहणाऱ्या खानापूरकरांना हुलकावणी दिली होती. इतर ठिकाणी पाऊस पडल्याच्या बातम्यांनी खानापूरकर अस्वस्थ झाला असतांनाच आज दुपारी तीनच्या सुमारास अखेर घननीळ बरसला. वाढता उष्मा, तळ गाठलेले नदी-नाले आणि विहीरी, ओला चारा मिळत नसल्याने पोट खपाटीला गेलेली जनावरे, […]