समांतर क्रांती / खानापूर हत्तींनी तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात अक्षरश: हैदोस मांडला आहे. रविवारी हत्तीने सावरगाळीतील शिवारात धुडगूस घालून शेती अवजारांसहीत ऊसाचे प्रचंड नुकसान केले. गेल्या आठवडाभरापासून हत्तीच्या कळपाचा या परिसरात वावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकताच जळगे येथील मळणीच्या खळ्यावर हत्तीने धुडगू घातल्याची घटना ताजी असतांनाच सावरगाळी येथे त्याने दहशत माजविली आहे. […]
गावगोंधळ / सदा टिकेकर आता साहित्य संमेलनांचा सुकाळ सुरू होईल. तसा तो झाला आहे. मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनाची मक्तेदारी घेतलेल्यांनी त्यांच्या जिव्हांना आताश: धार लावली आहे. ते त्या पाजळण्यास तयार आहेत. समाज परिवर्तनाच्या (?) कार्यात ते आता कधी नव्हे ते गढून गेले आहेत. डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी साहित्यिक – साहित्यरसिकांच्या गालांवर लाली आणून जाते न […]
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव-खानापूरचा हा परिसर खूप सुंदर आहे. सौदर्य सगळ्यानाच आवडतं, पण याच सौदर्यामुळे सीमावासीयांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये या भागावर दावा करीत आहेत. भाषा आणि साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो, परंतु येथे निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. परिणामी, अनेक पिढ्यांचे नुकसान झाले, ही भळभळती वेदना असल्याची […]
समांतर क्राती / खानापूर गणेबैलजवळील भूतनाथ यात्रेचा मान यंदा माळअंकले गावाला असून ही यात्रा मंगळवारपासून (ता.२४) सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजता महापुजेने यात्रेला सुरूवात होईल. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.२५) यात्रेची सांगता होणार आहे. गणेबैलजवळील भूतनाथ देवस्थानाच्या यात्रोत्सवाचा मान माळ अंकले आणि झाड अंकले या गावांना असतो. यंदा हा मान […]
शिक्षण विभागाने २०२४-२५ या वर्षात कर्नाटक राज्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्सिंचन कार्यक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. गतवर्षी दहावीच्या निकाल झालेली घट लक्षात घेऊन हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या निकालात गुणात्मक वाढ होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात […]
समांतर क्रांती / बंगळूर (Video सौजन्य Nav Samaja) अचानक कंटेनर कारवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४ वर घडली. नेलमंगल येथील ताळकेरे येथे हा अपघात घडला असून घटनास्थळावरील चित्र थरकाप उडविणारे होते. याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे जत्त तालुक्यातील मोरबगी (जि.सांगली-महाराष्ट्र) येथील आणि बंगळूरच्या एचआरएस लेआऊटमधील आयएएसटी या सॉफ्टवेअर […]
Car crushed under container; Six members of the same family killed समांतर क्रांती / बंगळूर अचानक कंटेनर कारवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४ वर घडली. नेलमंगल येथील ताळकेरे येथे हा अपघात घडला असून घटनास्थळावरील चित्र थरकाप उडविणारे होते. याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे जत्त तालुक्यातील मोरबगी (जि.सांगली-महाराष्ट्र) येथील […]
समांतर क्रांती / खानापूर Power supply disrupted in Khanapur taluka on Sunday दुरूस्तीच्या कारणास्तव उद्या रविवारी (ता.२२) खानापूर तालुक्यातील उचवडे, जांबोटी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, कालमणी, आमटे, चिखले, पारवाड, कणकुंबी, चिगुळे, हुळंद, चोर्ला आणि मान येथील वीज पुरवठा खंडीत राहणार आहे, असे हेस्कॉमने कळविले आहे.
समांतर क्रांती / रामनगर भरधाव कार मंदिरात घुसल्याने सतीदेवी मंदिर जमिनदोस्त झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) धारवाड-पणजी महामार्गावर चिंचेवाडी येथे घडली. या अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर कार रामनगरकडून कुंभार्डाच्या दिशेने निघाली असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (के.ए. ५१ एमयु ४८३३) थेट मंदिरात घुसली. यावेळी कौलारू सतीदेवी […]
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट लोकसभा, विधानसभा आणि तालुका व जिल्हा पंचायत निवडणुका या पक्षचिन्हावर लढविल्या जातात. पण, ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्ष चिन्ह दिले जात नाही, तर इतर चिन्हावर निवडणूक लढविली जाते. आता मात्र ग्राम पंचायतीच्या निवडणुकात सुध्दा पक्षाचे चिन्हावर होणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. महानगरपालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतींना सुध्दा अद्याप […]