आता मला बोलवंच लागेल / चेतन लक्केबैलकर खानापूर शहर म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे ‘पर्यटन स्थळ’ बनले आहे. यात लोकप्रतिनिधींचा आणि समाजसेवकांची झुल पांघरलेल्या बाजारबुणग्यांचा खेळ होतो आणि स्थानिक गोरगरीब व्यवसायीकांचा जीव जातो. विशेष म्हणजे येथे येणारा कुणीच अधिकारी परप्रांतीयांच्या वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाही. जांबोटी क्रॉस येथील खोकी अचानकपणे कोणत्याही प्रकारची कल्पना न […]
समांतर क्रांती वृत्त Burglary in Manturge, jewels worth lakhs looted खानापूर: तालुक्यातील मणतुर्गे येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५ लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारला. तसेच सहा हजारांची रोकडदेखील लंपास केली. अल्मेट मानू सोझ यांच्या आसोगा रोडवरील घरात ही चोरी झाली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, सोझ यांचे घर […]
समांतर क्रांती वृत्त Extreme step taken by married woman, husband and father-in-law arrested नंदगड: स्वयंपाक करता येत नाही, असा आळ घेत होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुंडपी (ता.खानापूर) येथे घडली. सबा मुजावर असे या विवाहीतेचे नाव असून तिचा पती मुजाहिद्दीन आणि सासरा शब्बीर मुजावर यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. […]
समांतर क्रांती वृत्त जांबोटी: मान येथील शिबोळी धबधब्याच्या डोहात बुडालेला युवक हुंचेनहट्टी (ता.बेळगाव) येथील असून आयान रियाजखान पठाण (वय 20) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांना सांगितले. तो धबधबा बघण्यासाठी त्याच्या मित्रांसमवेत गेला होता. पोहण्यासाठी दोघेजण डोहात उतरले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते बुडाले. त्यांच्यापैकी एकाला पर्यटकांनी बाहेर काढले .मंजुनाथ लमाणी (वय २०, […]
खानापूर : खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती रामचंद्र चौगुले यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. तालुक्याच्या सहकार, राजकारण आणि समाजसेवेचा अध्याय त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण राहील. त्यांचे योगदान तालुका कधीही विसरणार नाही अशा शब्दात माजी आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.हलकर्णी (ता. खानापूर) येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती […]
समांतर क्रांती वृत्तखानापूर: तालुक्यातील मान येथील शिंबोली धबधब्यात तरुण बुडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन तरुण धबधबा बघायला गेले होते. धबधब्याच्या डोहात पोहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो तरुण बुडल्याचे सांगितले जात आहे. शोध मोहीम सुरू आहे. तरुणाबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.
खानापूर: हलकर्णी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती श्री रामचंद्र गुंडूराव चौगुले (वय 75) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. दुपारी 2 वाजता हलकर्णी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
समांतर क्रांती वृत्त खानापूर: बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि […]
समांतर क्रांती वृत्त आमच्या शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले, त्याची भरपाई मिळालेली नाही. महामार्ग पूर्ण झालेला नाही, त्यामुळे प्रवाशी बेहाल आहेत. त्याकडे कुणाचे लक्ष नाही, त्याउलट सर्वसामान्यांची लूट करण्याचा प्रयत्न होत असेल, तर खळ्खट्याक निश्चित आहे, हे विसरू नका, असा इशारा भाजपचे नेते माजी आमदार अरविंद पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. अखेर आजपासून सुरू होणारी टोलवसुली […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सोमवारी ‘बंद दाराआड’ करण्यात आल्यानंतर युवा नेते आणि कार्याध्यक्ष निरंजन देसाई यांनीच समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांनी समाज माध्यमातून याबाबत वाच्यता केली असून पुन्हा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वर्तविल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल चर्चेला सुरूवात झाली आहे. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनीही ‘पदाधिकारी निवडीची घाई का?’ असा […]