जांबोटी येथे मंगळवारी म.ए.समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली आणि प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना रोहीत पाटील म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी सीमावासीयांनी शर्थ चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. यापुढे सीमावासीयांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सीमावासीयांच्या बाजुने […]
आमदार निलेश लंके यांचे आवाहन; गर्लगुंजीत मुरलीधर पाटील यांना प्रतिसाद सोमवारी (ता.०१) गर्लगुंजी येथे मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला मराठी भाषिकांनी तोबा गर्दी केली होती. त्यांच्या प्रचाराच्या धडाक्याने विरोधकांनाही धडकी भरली आहे. गेल्या ६६ वर्षांपासून मराठी भाषिक सीमाभागात कितपत पडला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अनन्वित अत्याचार करीत […]
आता हेच पहा ना, सर्वच उमेदवारांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी घोषीत करून आठवडा लोटला तरी उमेदवारी मिळविण्यासाठी केलेल्या करामतींच्या चर्चेची धूळ अद्यापही बसलेली नाही. खानापुरातील एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी तब्बल १२ कोटी मोजल्याची चर्चा आहे. हल्ली उमेदवारी मिळविणे ही तारेवरची कसरत झाली आहेच म्हणा! पण, म्हणून पक्षनेत्यांना तब्बल १२ कोटी चारल्याची ही […]
खानापूर: सध्या उष्म्याने नागरीक हैराण झाले असतांनाच राजकीय नेत्यांच्या तोंडाच्या वाफेने त्यात अधिकच भर घातली आहे. कोण विकास केल्याचे उर बडवून सांगत आहेत, तर कुणी विकासाचे गाजर दाखवून मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी हापापले आहेत. तब्बल अर्धा डझन नद्यांचे उगमस्थान असलेल्या खानापूर तालुक्यातील १४ गावातील जनता मात्र पाण्यासाठी चहूकडे भटकंती करीत आहे. Water shortage in […]
गेल्या पाच वर्षात तालुक्यात विकासाच्या नावाखाली काय झाले, हे तालुक्यातील जनतेने अनुभवले आहे. मागील निवडणुकीत आमच्या चुकांमुळेच बाहेरच्यांचे फावले. पण यावेळी ती चूक करायची नाही. महिलांनी यावेळी तालुक्याच्या विकासाचा विचार करून तालुक्यातीलच उमेदवाराला निवडून द्यावे. प्रत्येक गोष्ट माझ्यामुळेच झाली असा आव आणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. त्या ‘ब्रिटिशां’ना तालुक्याबाहेर हकलून लावू, असे सांगितले. मी प्रामाणिकपणे […]
कारण-राजकारण / चेतन लक्केबैलकर मराठी माणसांवरील अन्याय ही कांही नवी बाब नाही. कर्नाटकी सरकारकडून हा थिल्लरपणा राजरोसपणे गेल्या ६६ वर्षांपासून सुरूच आहे, त्यात काय विशेष. स्थानिक पातळीवर मराठी आणि कानडी भाषिक नेहमीच गुण्यागोविंदाने वावरत आले आहेत. नाही म्हणायला दोन्ही भाषिकांकडून स्वभाषेचा आभिमान बाळगला जातो. तो असायलाच हवा. मात्र, गेल्या ६६ वर्षात एखाद्या शेजाऱ्याने केवळ भाषाद्वेषातून […]
बंगळूर: राज्यात यावेळी सत्तापालट होणार असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. खासगी वृत्तवाहिनी आणि सी व्हॉटर्स यांच्या मतदानपूर्व संयुक्त सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला असून एकूण 224 जागांपैकी भाजपला 79 ते 89, काँग्रेसला 106 ते 116, निजद 24 ते 34 आणि इतर 0 ते पाच जागा पटकवतील, असा निष्कर्ष या अहवालात व्यक्त करण्यात आला […]
विशेष / चेतन लक्केबैलकर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतो. दर पाच वर्षांनी होणा-या निवडणुकांवेळी उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. ब-याचवेळा हा तपशिल प्रसार माध्यमातून प्रसिध्दही होतो. यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात किती वाढ आणि किती घट झाली, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट… आमदार, खासदार […]
खानापूर: येथील म.ए. समिती कार्यालयासमोरील नामफलक आज पुन्हा हटविण्यात आला. मराठी मते केवळ समितीलाच मिळणार असल्याने हा अट्टाहास चालला असल्याचे आता स्पष्ट झाले असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.बेळगाव-पणजी महामार्गावर गणपती मंदिरच्या बाजूला समितीचे संपर्क कार्यालय आहे. पहिल्यांदा नगर पंचायतीची परवानगी नसल्याचे कारण दाखवून फलक काढण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला नाही. रितसर परवानगी […]
खानापूर: स्वत:स शिवसेनेचे उमेदवार म्हणवून घेणारे के.पी.पाटील यांचा सेनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी आणि जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी सेनेचा समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठींबा असून शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, आवाहन केले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्प्न पूर्ण होर्इपर्यंत सीमाभागात सेना […]