- अभिलाष हिंदूराव देसाई, अध्यक्ष छत्रिय मराठा परिषद, खानापूर तालुका
भक्ती आणि आधात्माच्या जोरावर अनेक महानुभवांनी जगाच्या उध्दारचा संकल्प केला आणि त्यासाठी त्यांचे जीवन समर्पित केले. समाजावर संस्कार करण्यासाठी त्यांचे संपर्ण जीवन खर्ची घातले. समाजाच्या विकासात-उन्नतीत अशा संत महात्म्यांचा वाटा महत्वाचा ठरला आहे. बालपणातच भक्ती आणि आधात्माकडे वळलेले बंगळूर येथील गोसावी महासंस्थान मठाचे पिठाधिपती जगद्गुरू वेदांताचार्य श्रीश्रीश्री मंजुनाथ भारती स्वामी यांनी संपूर्ण देशभरात त्यांच्या अगाध ज्ञानाने श्रध्देची सावली धरली आहे. आजच्या गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभीवादन करतांना त्यांच्या जीवन कार्याचा घेतलेला हा आढावा..
श्री मंजुनाथ स्वामी हे मुळचे हल्याळ तालुक्यातील बी.के.हळ्ळी गावचे. यल्लव्वा आणि देमान्ना यांचे ते मोठे सुपुत्र. घरची सधन स्थिती, एकत्र कुटुंब असतांनाही आध्यात्मिक आणि भक्तीनादात रंगलेले हे कुटुंब होते. स्वामी लहान असतांना त्यांचा अधिक वेळ आजोबा श्री. कृष्णाप्पा बांगडी यांच्यासमवेत घालवीत. त्यांच्याकडून स्वामीजींना आधात्माची ओळख झाली आणि ते भक्तीमार्गाकडे वळले. याच काळात त्यांनी के.के.हळ्ळी येथील श्री नित्यानंद स्वामी आणि प.पु.श्री सुब्रम्हण्य स्वामींच्या समाधीला भेट दिली. ते टी.सी.मल्लापूमठ, श्री विठ्ठल गौडरू, एम.एन.तळवार यांच्यासह विविध साधू-स्वामींच्या संगतीने सत्संग, भजन-किर्तनात सहभागी होऊ लागले आणि त्यांची आधात्माबद्दलची गोडी वाढली.
प्राथमिक शिक्षण घेत असतांना ते बानसगीरी येथील लक्ष्मी मंदिरात होणाऱ्या दैनदिन भजन कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. त्यांनी मंदिरात राहण्याची परवानगी मिळविली. प.पु.नारायण महाराज यांनी या बालकाची भक्ती आणि श्रध्दा समर्पण पाहून त्यांना भगवतगीतेत पारंगत करून घेतले. तसेच त्यांना ज्ञानेश्वरी, अभंग, भागवत, दासबोध आदींचीही गोडी लावली. त्यांच्या अध्ययनाबरोबर ते श्री नारायण महाराजांसमवेत प्रवचन आणि किर्तन देऊ लागले. त्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि देशातील विविध राज्यात किर्तन आणि प्रवचने केली आहेत.
श्री नारायण महाराजांकडून धार्मिक आधात्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना परमेश्वर भेटीचे वेध लागले. त्यासाठी त्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग करून आधात्माचा मार्ग पत्करला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला आणि विठ्ठल भेटीच्या ओढीने त्यांनी थेट पंढरपूरला प्रस्थान केले. बराच काळ त्यांनी विठ्ठल भक्तीत घालविला. देवाज्ञेनुसार ते निपाणी येथील महातपस्वी ज्यांनी तब्बल ५० वर्षे अंगावर कपडे न घालता आणि अन्नसेवन न करता आधात्म साधना केली, ते वसंत महाराज कुर्ली यांच्या भेटीला आले. तेथे त्यांनी आधात्मावर अनेक प्रवचनेही दिली. त्यांच्या जीवनाचा बराच काळ त्यांनी योगी अवधूत यांच्या सानिध्यात घालविला. त्यांच्या आदेशानुसार त्यांनी आडी येथील दत्त मंदिरातील प.पु.श्री मरमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांची सेवा करण्यात ते मग्न झाले. त्याकाळात त्यांनी आधात्म आणि भक्ती मार्गाचे रहस्य शोधून त्यांचा सखोल अभ्यास केला. अनेक धर्मग्रंथांचे अध्ययन करून ज्ञानप्राप्ती करून घेतली. त्यानंतर त्यांनी पं.श्री अरूण कुलकर्णी, प. श्री मधुकरजी लाकडे आणि पं. श्री महादेव मोरे यांच्याकडून संगित साधना केली. संगीत शिकून त्यांनी त्याचा वापर त्यांच्या प्रवचन आणि किर्तनांसाठी केला.
गोसावी महासंस्थान मठाचे पिठाधिपती झाल्यानंतरही त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी प्रवास करून समाजावर संस्कारांची बरसात केली. महासंस्थानाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. गोर-गरिबांना मदत केली. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी घेतली. त्यांचे आशिर्वाद अनेक नेत्यांनी घेतले. कर्नाटकासह देशभरात पसरलेल्या मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा ते करीत आहेत. या समाजाच्या उन्नतीसाठी ते झटत आहेत. आधात्माकडून विश्वशांती हा त्यांचा ध्यास आहे. आज गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने समस्त जगासाठी गुरूस्थानी असलेले प.पु.मंजुनाथ स्वामीजींच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम.
खानापूर म.ए.समिती नेत्यांना कानपिचक्या
समांतर क्रांती वृत्त खानापूर: विधानसभा निवडणुकीतील नामुष्कीजन्य पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या आणि मराठी भाषीकांच्या मागणीचा आदर ठेवत पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिले. समितीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याने त्याठिकाणी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात सोमवारी शिवस्मारकात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, बैठकीत निवडीसंदर्भातील चर्चेऐवजी कार्यकर्त्यांनी नेत्यांना कानपिचक्या देत पुढील काळात तरी शहाणे व्हा असा सल्ला दिला. नेते चुकले म्हणून […]