समांतर क्रांती / खानापूर
भीमगड अभयारण्य आणि वनपरिक्षेत्रात असलेल्या गावांतील रहिवाशांना योग्य पुनर्वसन मोबदला देऊन टप्प्याटप्प्याने स्थलांतरित केले जाईल, असे आश्वासन वने, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले आहे.
सोमवारी(ता.१६) रात्री मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तळेवाडीला भेट दिली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रत्येक कुटुंबाला सरकार १५ लाख रुपये नुकसान भरपाई देईल, असे आश्वासन त्यांनी दिले आणि स्थलांतर ऐच्छिक असावे यावर भर दिला.
खांड्रे यांनी सांगितले की, घनदाट भीमगड अभयारण्यातील १३ वस्त्यांमध्ये सध्या ३०५९ लोक असलेली ७५४ कुटुंबे राहतात. जर संपूर्ण गावातील रहिवाशांनी स्थलांतर करण्यास सहमती दर्शविली, तर खात्रीशीर भरपाई आणि पुनर्वसन उपायांसह प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होऊ शकते.
यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक ब्रिजेशकुमार दीक्षित, उपमुख्य वनसंरक्षक कुमार पुष्कर, बेळगावचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चौहान, उप वनसंरक्षक मारिया क्रिस्तू राज, सहायक वनसंरक्षक सुनीता निंबरगी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अशी आहे कुटुंबसंख्या..
- कोंगळा मध्ये 63 कुटुंबे, पास्तोलीमध्ये 36, गवाळी 90, अबनाळीमध्ये 81, जामगावमध्ये 82, हेम्मडगामध्ये 128, तळेवाडीत 13, देगावमध्ये 31, पालीमध्ये 73, मेंडिलमध्ये 40, कृष्णापूरमध्ये 12, होल्डामध्ये 7 आणि आमगावमध्ये 98 कुटुंबे आहेत. या सर्व कुटुंबांसोबत 1540 पुरुष आणि 1442 महिला, एकूण 3059 जण येथे राहतात.
सरकारचे अपयश..
गावगोंधळ / सदा टिकेकर ‘आमच्या हातून तुमचे भले करणे शक्य नाही.’ असे सांगण्याचे धाडस राजकर्त्यांना होत नाही तेव्हा ते पळवाट शोधतात. त्यातून ते खरे तर स्वत:च्या अपयशाचे जाहीर प्रदर्शन करीत असतात. ‘आम्ही तुम्हाला आमुक देतो, तमुक देतो’ असे जाहीर करून गोगरिब लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यातून त्या बिचाऱ्या नागरिकांच्या पुढच्या पिढ्यांची मसणात घेऊन जाण्याचाच त्या […]