कुतूहल / समांतर क्रांती
जीन्स वापरणे ही फॅशन बनली आहे. 80च्या दशकात जीन्सने भरतीयावर गारुड केले आणि पारंपारिक सुती कपडावर जणू संक्रात ओढवली. जीन्सच्या पॅन्ट अबाल-वृद्धांच्या आवडीची बनली आहे. लहान असो कि मोठे, प्रत्येकाच्या जीन्स पँटच्या उजव्या खिशात आणखी एक लहान खिसा असतोच. ही केवळ फॅशन आहे कि आणखी काय?
जीन्सचा वापर रशिया आणि युरोपीय देशात मोठ्या प्रमाणात पूर्वीपासूनच होतो. विशेषतः जीन्सचे कपडे हे केवळ कामगार वापरत. म्हणजे कामगारांसाठीच हे कपडे होते. त्यामागेही एक कारण आहे. एकतर जीन्सचे कपडे लवकर फाटत नसत ;शिवाय ते दररोज धुवावे लागत नव्हते. आठवडाभर वापरून ते धुतले जात. त्यामुळे कामगारांचा वेळ वाचत असे.
पण खिशात खिसा का?
जीन्सच्या सर्वच पँटच्या उजव्या खिशात छोटा खिसा हमखास पाहायला मिळतो. कामगारांना त्याकाळी हातात घड्याळ बांधणे जिकिरीचे होई. कारण काम करताना ते नादुरुस्त होण्याची शक्यता अधिक असे. घड्याळ ठेवण्यासाठी म्हणून जीन्स पँटच्या खिशात छोटा खिसा असायचा. पुढे जीन्सच्या कापडला मागणी वाढली. जीन्स देशीदेशी पोहचली, त्याबरोबर जीन्स पँटच्या ‘तो’ खिसा फॅशन म्हणून अजरामर झाला. त्या खिशाचा वापर कुणीच करीत नाही, तरीही तो असतोच…
नंदगडात भव्य शिवस्फूर्ती स्थळ उभारणार
नंदगड : समांतर क्रांती न्यूज पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नंदगड येथे भव्य शिवस्फूर्ती स्थळ उभारण्याचा निर्णय आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. या शिवस्फूर्ती स्थळावर भव्य असा सिंहासणाधिस्थित छ. शिवारायांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदगड येथील ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा भरणार आहे. तत्पूर्वी शिवस्फूर्ती स्थळाचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु […]