समांतर क्रांती / खानापूर
येथील पोलिस स्थानकातील बहुचर्चीत हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर तालुक्यात कार्यरत असलेल्या जयराम यांना शहरातील लॉजवरील छापा प्रकरण भोवले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा सध्या खानापूरात सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जयराम हमन्नावर हे खानापूर आणि नंदगड येथे सुध्दा कार्यरत होते. ते अनेकवेळा वादग्रस्त ठरले होते. तरीही त्यांची वारंवार खानापुरात बदली करण्यात आली होती. यमकनमर्डी येथे त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर पुन्हा ते खानापुरात रुजू झाले होते. दरम्यान सोमवारी (ता. १६) त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
अचानक झालेल्या त्यांच्या बदलीमुळे पोलिस खात्यात खळबळ माजली आहे. कांही दिवसांपूर्वी येथील एका लॉजवर पोलिसांनी छापा मारला होता. तेथे कांही तरूण-तरूणी आणि महिला आढळल्या होत्या. पण, त्यांच्यावर अथवा लॉज मालकावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यातूनच ही बदली झाली असल्याची चर्चा पोलिस खात्यात सुरू आहे. आता जयराम हमन्नावर यांची बदली बेळगाव येथील कंट्रोल रुममध्ये बदली झाली आहे.
पुढचा ‘नंबर’ कुणाचा?
गेल्या कांही दिवसांपासून खानापूर काँग्रेसने तालुक्यातील भ्रष्टाचाराविरोधात दंड थोपाटले आहेत. विशेषत: पोलिसांकडून तालुक्यातील नागरीकांची सोय होण्याऐवजी त्रासच अधीक होत असल्याने पोलिस खात्यातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र आता सुरू झाले आहे. पुढील नंबर कुणाचा? अशी चर्चादेखील यानिमित्ताने सुरू झाली आहे.
थांबलेल्या ट्रकमध्ये मृतदेह; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
समांतर क्रांती / खानापूर तीन दिवसांपासून थांबलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आल्याने गणेबैल टोल नाका परिसरात खळबळ माजली आहे. मुगुटसाब फकरुद्दीन कोट्टूर (वय ४५, रा. एम.के.हुबळी) असे या चालकाचे नाव आहे. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी (ता.१५) रात्री १२ वाजून १० मिनिटांनी हा ट्रक (के.ए.०१ ए.०९२९) टोलवरून गणेबैच्या […]