समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील चापगाव ग्राम पंचायतीचे राजकारण सध्या तापले आहे. सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षावर अविश्वास ठराव समंत करण्याचा प्रयत्न केला, पण उच्च न्यायालयाने आजच्या (04) विशेष बैठकीला स्थगिती आदेश बजावल्याने सदस्यांचा हिरमोड झाला आहे. अध्यक्षा गंगव्वा कुरबर आणि उपध्यक्षा मालुबाई पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यासाठी आज विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. आजच्या बैठकीविरोधात अध्यक्षा गंगव्वा कुरबर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धारवाड खंडपिठाने सदर बैठक स्थगित करण्याचे आदेश बजावले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी (ता. 06) पुढील सुनावणी होणार आहे. अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आला असताना अचानक अविश्वास ठरावाचे नेमके कारण काय? याबाबत सध्या चापगाव परिसरात चर्चाना उधाण आले आहे. एकंदर पंचायतीचे राजकारण तापले आहे.
हत्तीचा मोर्चा माणिकवाडी परिसरात
भात पिकांचे नुकसान; तालुकाभर उच्छांदसमांतर क्रांती / खानापूरदोन दिवसांपूर्वी भटवाडा-कामतगा परिसरात मुक्त संचार करणाऱ्या हत्तीच्या कळपांनी आता माणिकवाडी परिसरात मोर्चा वळविला आहे. मंगळवारी हत्तींनी माणिकवाडी क्रॉसजवळील गुंजाप्पा घाडी यांच्या भाताच्या वळींचे हत्तींनी नुकसान केले. हातातोंडाला आलेले पीक मातीमोल होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना हत्ती समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तब्बल […]