चांद्रयान ३ आवकाश झेपावले. त्याच्या उड्डाणासाठीच्या रॉकेटच्या निर्मितीत योगदान दिलेले इस्रोचे वैज्ञानिक आणि अनगडीचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर यांच्याबद्दल त्यांना विज्ञानाचे बाळकडू पाजणारे त्यांचे शिक्षक तथा कवि-लेखक संजीव वाटूपकर यांनी ‘समांतर क्रांती’कडे व्यक्त केलेले हे मनोगत…
श्री प्रकाश नारायण पेडणेकर हा आपल्या मराठा मंडळ कापोली हायस्कूलचा हुशार विद्यार्थी. प्रकाश मुळातच हरहुन्नरी आणि चौकस होता. PUC ची दोन वर्ष झाल्यानंतर मायक्रोबायोलॉजी हा विषय कुठल्या कॉलेजमध्ये आहे याचा शोध घेत होता? चौकशीसाठी पुण्यालाही जाऊन आला होता. त्यामुळे वडील चिंतेत पडले होते. तो इंजिनियर व्हावा असं त्यांना वाटत होतं. कारण थोरल्याला इंजिनियर होता आलं नाही. पण भौतिक रसायनशास्त्रातून धारवाड युनिव्हर्सिटीचा सुवर्णपदक विजेता झाला होता. त्यामुळे आपल्या धाकट्या चीरंजीवाने इंजिनीयर व्हावे, ही वडिलांची सार्थ अपेक्षा होती, पण हा ऐकत नव्हता. मी त्याचा हायस्कूलचा विज्ञान शिक्षक असल्यामुळे तो माझं तरी ऐकेल यासाठी ते माझ्याकडे घेऊन आले. मी त्याला माझे वर्गमित्र भरत तोपीनकट्टी (जी.एस.एस. कॉलेजचे प्राध्यापक) यांना भेटवलं. त्यांनी त्याची समजूत काढली आणि पहिला भाकरी मिळव नंतर संशोधनाकडे जा. त्यांनी प्रकाशला प्रश्न केला, मायक्रोबायोलॉजीमधून ग्रॅज्युएट झालेले बेळगावमध्ये किती नोकरी मिळवलेले दाखवशील? या प्रश्नाने प्रकाश निरुत्तर झाला आणि आपला निर्णय बदलून इंजिनिअरिंगला गेला. G.I.T.मधून मेकॅनिकल मधून गुणवत्तेसह B.E.झाला.
त्याने आता गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी ही वडिलांची अपेक्षा, पण प्रकाशला अजून शिकायचं होतं. त्याला आयएएसची परीक्षा द्यायची होती त्यासाठी पुण्याला एक वर्ष जाऊन त्यांने अभ्यास केला आणि परीक्षाही दिली, पण यश आलं नाही. हे सगळे नाद त्याने सोडावे आणि नोकरी करावी ही वडिलांचे तीव्र इच्छा. पण त्याला घाई नव्हती. परत शिक्षणात गुंतला आणि गोव्याच्या BITS पिलानी मधून विशेष प्राविण्यासह M.Tech. झाला. मला नाव आठवत नाही, पण पुण्याजवळील एका मरीन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनं नोकरीला सुरुवात केली. तिथे असतानाच इस्त्रोची जाहिरात यावी आणि प्रकाशनं अर्ज भरावा. 120 जणांमधून मुलाखतीला 20 जणांची निवड व्हावी. हा एकटाच त्यामध्ये I.T.नसावा.आणि नेमकी त्याचीच निवड व्हावी हा योगायोग नव्हता.त्यात त्याचे परिश्रम आणि जिद्द होती. शेवटी प्रकाशचं संशोधनाचं दिव्य स्वप्न साकार झालं. तीव्र इच्छा असावी लागते मग मार्गही सापडतात. आज तिसऱ्या चंद्रयान मोहीमेशी जेंव्हा त्याचं नाव जोडलं गेलं. मोहिमेचं कौतुक सारा देश करतोय तेंव्हा आमचेही उर भरून आले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे आम्ही शिक्षक राहिल्याचा अभिमान वाटला. “चंदनाच्या गंधे माती सुगंधावी” असं झालं आमचं. टप्प्याटप्प्याने शिखरं चढत गेलेला प्रकाश गगनाला प्रकाशुन गेला. त्याचं अभिनंदन व्हावं अशीच ही घटना. त्याच्या भावी जीवनातील ही संशोधना यात्रा अशीच तेजाळत राहावी, हीच अपेक्षा.
चांद्रयान-३ मध्ये खानापूरच्या मराठमोळ्या सुपुत्राचे योगदान
खानापुरातील ‘त्या’ कॅफेमध्ये दडलंय काय?
समांतर क्रांती खानापूर: दहा बाय दहाचे चहाचे दुकान. त्यात दोघांना बसता येईल, असे विसेक गाळे. एरवी, स्मशान शांतता असणाऱ्या या दुकानात कॉलेज सुटले की जणू किलबिलाट सुरू होते. नेमके या कॅफेंमध्ये दडलंय काय? असा प्रश्न सर्रास सगळ्यांनाच पडतो. पण, त्याकडे लक्ष देतंय कोण? या कॅफेंमध्ये काय दडलंय, याचा खुलासा शुक्रवारी झाला. शहरात तीन-चार अशी चहाची […]