‘त्या’ तेरा गावातील लोकांचा सवाल; भाजपचा ‘बाजार’ उठणार: लक्ष्मण कसर्लेकर
खानापूर: खोटं बोला; पण रेटून बोला, ही भाजपची गल्ली ते दिल्लीपर्यंत रणनीती राहिली आहे. त्यात खानापूरचे नेतेदेखील मागे नाहीत. भाजपचे नेते प्रमोद कोचेरींनी याबाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दीडड वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेेऊन तालुक्याच्या पश्चिम घाटातील १३ गावांत मोबाईल टॉवर उभे करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यासाठी त्यांनी खासदार अनंतकुमार हेगडेंनी प्रयत्न केल्याचा दावा केला होता.
प्रमोद कोचेरी यांनी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्रकार परिषद घेऊन खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या प्रयत्नातून देगाव, जामगाव, चिगुळे, मुघवडे, कबनाळी, चापोली, पारवाड, हुळंद, आमगाव, मेंडील, गवाळी, पास्टोली आणि कोंगळा या १३ गावात मोबाईल टॉवर उभे करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आवघ्या सहा महिन्यात हे काम तडीस जाणार असल्याचा दावा केला होता. पण, तब्बल दीड वर्षानंतर हा जुमला होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोचेरी साहेब, हेगडेंचे टॉवर कुठे आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
जुमलेबाज भाजप नेते!
प्रत्यक्षात ही १३ गावे अभयारण्य तसेच इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने तेथे मोबाईल टॉवर उभारण्यासाठी केंद्रीय हरित लवादाकडून सहजासहजी परवानगी मिळणे अशक्य आहे. जर हेगडेंनी टॉवर परवानगी मिळविली असती तर त्या भागातील रस्त्यांनाही सहज परवानगी मिळाली असतील. पण, तसे कांहीच झालेले नाही. केवळ विधानसभा निवडणूक तोंडावर होती, त्यासाठी कोचेरी यांनी या भागातील लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच ही ‘खोटी’ माहिती प्रसिध्द केली होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोचेरींना जाब विचारणार!
पश्चिम भागातील रस्ते, पाणी आणि इतर मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यात वनकायदे आडवे येत आहेत. खासदारांनी प्रयत्न केल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. पण, गेल्या ३० वर्षात हेगडेंनी कांहीच प्रयत्न केले नाहीत.तत्कालीन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी नेरसे-गवाळी रस्त्यावररील पूल आणि रस्ता कामाला मंजुरी मिळविली होती. पण, वन खात्याने आडकाठी केली. अभयारण्य केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने खासदारांनी प्रयत्न करणे आवश्यक होते.
टॉवरची बातमीही फसवी आहे, हे आम्हाला माहिती होते. आता प्रचारासाठी प्रमोद कोचेरी गावात आल्यास त्यांना जाब विचारणार आहोत. त्याचे उत्तर भाजपच्या नेत्यांना द्यावे लागेल, असे मत या भागातील नागरीकांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केले. एकंदर, यावेळी कारवार मतदार संघातून जुमलेबाज आणि खोटारड्या भाजपचा ‘बाजार’ उठणार यात शंका नाही, असे मत आमटे ग्रा.पं.माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी व्यक्त केले.
हिट अँड रन; पत्नी ठार, पती जखमी
खानापूर-अनमोड रस्त्यावर अपघात; वाहनाचा शोध जारी खानापूर: अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेली महिला उपचार सुरू असतांनाच ठार झाली. दुचाकीचालक पतीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खानापूर-अनमोड रस्त्यावर बुधवारी (ता.१७) सायंकाळी हा अपघात घडला. याबाबतची अधिक माहिती अशी, पाली येथील नामदेव महादेव गावडा (वय […]