
खानापूर: बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील गोव्यात वास्तव्यास असलेल्या बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर खानापूर-बळगावकर प्रिमियर लीग शनिवार (ता.०८) आणि रविवारी (ता.०९) कॉम्पेक्स् ग्राऊंड फोंडा येथे होणार आहे.
स्पर्धेसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रथम पारितोषिक रू. २५ हजार आणि उपविजेत्या संघासह १५ हजारांचे पारितोषिक भास्कर काकोडकर यांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. अशोक सावंत यांच्याकडून विजेत्या आणि उपविजेत्या संघास आकर्षक चषक दिले जाणार आहेत. त्याशिवाय इतरही वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर, लैला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील, भाजप युवा नेते किशोर हेब्बाळकर आणि काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेचे आयोजन के.बी.पी.एलचे अध्यक्ष रमेश बिडीकर (हाळ झुंजवाड), उपाध्यक्ष विल्सन परेरा (तिओली), खजिनदार केशव घाडी (भालके बी.के.), सेक्रेटरी भूषण पाटील (क. नंदगड) यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.

पाच दिवसांचा हरिजागर; रंगणार विठ्ठल नामाचा गजर
मणतुर्गे येथे श्री पांडुरंग नाम सप्ताहाला सुरुवात खानापूर : मणतुर्गे (ता.खानापूर) येथील श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताहाची बुधवार दि. ५ रोजी रात्रौ ८ वाजता जय जय राम कृष्ण हरी या नाम मंत्राने सुरुवात झाली. पुढील पाच दिवस हा सप्ताह होणार असून या काळात हरिनामाच्या गजरात परिसर न्हाऊन निघणार आहे. तरी भाविकांनी या पर्वणीचा लाभ घेण्याचे […]