समांतर क्रांती / खानापूर
आमंत्रण लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय उधळून लावलेल्या खानापूर पोलिसांनी ‘स्वखुशी’ने चाललेल्या ‘धंद्या’ला हातभार लावल्याची चर्चा आहे. शहरांतर्गत महामार्गावरील गामधीनगर येथील एका लॉजवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी मुला-मुलींसह अनेक जोडपी आढळली. पण, त्यांनी आम्ही स्वखुशीने लॉजवर आल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई टाळली.
खानापूर शहर आणि परिसरातील लॉज ही शरिर विक्रयाची ठिकाणे बनली आहेत. दिवसाढवळ्या या लॉजवर पुरूष-महिलांसह तरूण-तरूणींचा ‘राबता’ असतो. अलिकडेच शहरांतर्गत महामार्गावरील आमंत्रण लॉजवर छापा टाकून अनेकांना अटक केली होती. त्यानंतर शहरातील वेश्या व्यवसायावर चर्चा सुरू असतांनाच गांधीनगर येथील ‘त्या’ एकमेव लॉजमध्ये असाच प्रकार चालल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली छापा मारला. तेथे आठ ते दहा जोडपी आढळली. पण, त्यांनी स्वखुशीने लॉजमध्ये आल्याचे सांगितल्याने गुन्हा नोंद न करताच त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे आश्चर्यजनक संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसाची ‘दर्यादिली’
आम्ही स्वखुशीने आलो आहोत, असे म्हणताच पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना सोडून दिले. ही गोष्ट कुणालाच पटण्यासारखी नाही. तसेच असेल तर आमंत्रण लॉजवरील ‘त्या’ जोडप्यांवर कारवाई का केली? गांधीनगर प्रकरणात मांडवली झाली नाही ना? असा प्रश्न विचारला जात असून पलिसांची ही ‘दर्यादिली’ हस्यास्पद ठरली आहे.लॉज मालकांवरील ‘प्रेमा’पोटी पोलिसांनी कारवाई टाळल्याची चर्चा सुरू असून यासंदर्भात कांहीनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करण्याची तयारी दर्शविली आहे.
भ्रष्टाचाराची बजबजपुरी
खानापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालयात सध्या भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्यात पोलिस सुध्दा मागे नाहीत. हे गेल्या कांही दिवसांतील पोलिसांच्या ‘कार्य-कतृत्वा’तून स्पष्ट झाले आहे. लोकप्रतिनिधींचा शासकीय अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचा हा परिपाक आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
मयेकर नगरातील मंदिरात दत्त जयंती उत्साहात
समांतर क्रांती / खानापूर येथील मयेकरनगरातील मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जयंतीचे औचित्य साधून दत्त मंदिराचे चौकट पूजन पार पडले. यावेळी मयेकर नगरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्त मंदिर चौकट पूजन रामगुरवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी संजीव उप्पीन व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पार पडले. त्यांचा शिवा मयेकर यांनी शाल व […]