
समांतर क्रांती / बेळगाव
स्पा आणि ब्युटी पार्लरमध्ये राजरोस चाललेल्या वेश्या व्यवसायावर सीईएन पोलिसांनी छापा मारून सहा जणींची सुटका केली आहे. या प्रकरणी ब्यटी पार्लरच्या मालकिणीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार अनगोळ बेळगाव येथील मुख्य रस्त्यावरील अंजली स्पा आणि ब्युटी पार्लरमध्ये उघडकीस आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीईएन पोलिस स्थानकाचे निरीक्षक बी.आर. गडेकर यांनी छापा मारला. यामध्ये सहा महिलांची सुटका करण्यात आली असून कांहींना अटक करण्यात आली आहे. सीईएन पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

कौलापूर येथील क्वालिटी पोल्ट्रीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील कौलापूर येथील क्वालिटी ऍनिमल फिड्स प्रा. लि. (पोल्ट्री फार्म) ला प्रदूषण महामंडळाने दणका दिला आहे. तात्काळ पोल्ट्री फार्ममधील कामकाज बंद करावे. तसेच या काळात वीज पुरवठा खंडित करावा, अशी सुचना हेस्कॉमला करण्यात आली आहे. हरकत नोंदविण्यासाठी क्लालिटी व्यवस्थापनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून या काळात महामंडळापुढे मत न मांडल्यास […]