समांतर क्रांती / खानापूर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज खानापूर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. शिवस्मारक चौकात जोरदार निदर्शने करून तहशिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. ना. शहांना तात्काळ मंत्रीपदावरून पायउतार करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गृहमंत्री शहांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणे ही फॅशन बनल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून सर्वत्र त्यांचा धिक्कार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरूवारी (ता. १९) येथील शिवस्मारक चौकात ना. शहांच्या प्रतिकृतीला चप्पने मारहाण करीत दहन करण्यात आले. तसेच टायर पेटवून जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना न जुमानता आंदोलन करण्यात आले.
त्यानंतर ‘अमित शहा मुर्दाबाद, अमित शहांचा धिक्कार आणि अमित शहा राजिनामा द्या,’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी तहशिलदार कार्यालयाला धडक दिली. प्रसंगी बोलतांना ब्लॉकचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी म्हणाले, भाजपची भूमीका ही नेहमीच संविधान विरोधी राहिली आहे. आता तर गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेबांबाबत बेताल वक्तव्य करीत आकलेचे तारे तोडले आहेत. आता अमित शहा मुर्खासारखे खुलासे करीत असून त्यावरून त्यांच्या वैचारीक दिवाळखोरीचे दर्शन घडत आहे. त्याबद्दल त्यांचा निषेध करीत असून त्यांनी तात्काळ राजिनामा द्यावा.
यावेळी बोलतांना नगरसेवक लक्ष्मण मादार म्हणाले, अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेबांना कमी लेखण्याचे दुष्कृत्य केले आहे. भाजपने आतापर्यंत मनुवाद आळवत संविधान नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याचे केंद्रातील सरकार हे मनुवादी असल्याचे शहा यांनी दाखवून दिले आहे. पण, आम्हाला देव-देवतांपेक्षा घटनाकार डॉ. बाबासाहेब अधिक पुजनीय आहेत. शहांना तात्काळ मंत्रीपदावरून पायउतार करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील.
प्रसंगी शहर ब्लॉकचे अध्यक्ष महांतेश राऊत, यशवंत बिर्जे, गौसलाल पटेल, सौ. सावित्री मादार आदींनी विचार मांडतांना अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी केपीसीसी सदस्य महादेव कोळी, काँग्रेस नेते चंबान्ना होसमनी, सुरेश जाधव, ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, कार्यकर्ते ईश्वर बोबाटे, लियाकतअली बिच्चन्नावर, जॉकी फर्नांडीस, गुड्डू तेकडी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- केंद्रातील सरकार संविधान विरोधी..
केंद्रातील भाजपचे सरकार हे संविधानविरोधी असून ते बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा उल्लेख ‘तडिपार गुंड’ असा केला. त्यांच्याविरोधात झालेल्या कारवाईतून ते केवळ संविधानामुळेच सुटू शकले असतांना त्यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या संघीय संस्काराची ओळख करून देणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
खानापूर तहशिलदार कार्यालय : दिव्याखाली अंधार..
समांतर क्रांती / खानापूर येथील मिनिविधानसौध म्हणजे तहसिल कार्यालय आवार हा समस्यांचे आगार आणि वाहनतळ बनले आहे. विशेष म्हणजे येथे वाहने लावू नयेत, असा फलक असलेल्या ठिकाणीच कर्मचारी आणि अधिकारी त्यांची वाहने थांबवितात. यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ‘सामाजिक’ अशिक्षितपणाच उघडा पडत आहे. मिनीविधानसौधच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजुला ‘नो पार्किंग’ या इंग्रजी फलकासह अन्य एक फलक लावण्यात […]