
खानापूर: हिंदू धर्मियात जागृती निर्माण करण्यासाठी रविवारी (ता.०२) रोजी येथील मलप्रभा मैदानावर हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय सेवा मंचचे प्रमुख पंडीत ओगले यांनी आज मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, धर्मांतर, धर्म परिवर्तन, बांगलादेशात हिंदू धर्मीयावर होत असलेले अत्याचार, वफ्फ बोर्डाचा अतिरेक आणि हिंदू बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील १८ पगड जाती-जमातींना संघटीत करणे हा या धर्मसभेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या धर्म परिषदेला हिंदुंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सुहास गुळेकर, विश्वनाथ पाटील, विनायक चव्हाण, रजत सडेकर, सोमनाथ गावडे, मानसिंग चौगुले, सुभाष गुरव, ज्योतिबा चव्हाण, शुभंम आंबेवाडकर, ज्योतिबा चौगुले, बबन लोंढेकर, कैलास साळवी, प्रणय गोरल व लोकेश कलबुर्गी तसेच आदीजण उपस्थित होते.
कुटुंबवत्सल आणि सेवाभावी व्यक्तिमत्व: कै. राजाराम पाटील
कांहीच्या आयुष्यात संकटांनी गारूड केलेले असते. ती संकटे त्यांच्या जगण्याच्या आकांक्षेशी इर्शाच करीत असतात जणू. त्यातूनही ही माणसं वाट काढतात, संकटांशी दोन हात करतात. पळवाट मात्र काढत नाहीत. यशाच्या शिखरापर्यंत पोहचतात. पण, त्यांचे पाय मात्र मातीत घट्ट रोवलेले असतात. कारण त्यांची नाळच मुळात मातीशी जोडलेली असते. आपल्या समाजाशी ते खऱ्या अर्थाने एकरूप झालेले असतात. त्यामुळेच […]