
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट
कौलापूर वाडा हे गाव नक्कीच खानापूर तालुक्यात किंवा लोकशाहीवादी भारत देशात आहे का? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गवळ्यांच्यावाड्यात सर्रास दिसतात ते गुरांचे गोठे. त्यामुळे माशांचा, डासांचा प्रादूर्भाव वाढून रोगराईने माणस मरूनच जातील, अशी स्थिती दिसत असली तरी प्रत्येक गवळीवाड्यावरील स्वच्छता अशी असते ही गोठ्यातही एकाद्याचे मन रमून जाईल. अशाच स्वच्छ आणि सुंदर कौलापूर वाड्याला भांडवलदारांची नजर लागली आहे.
गावाच्या शेजारी कांही वर्षांपूर्वी क्वालिटी पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू झालेल्या प्रकल्पाने आता आवाढव्य स्वरूप धारण केले आहे. याचा परिणाम येथील जनमाणसांवर होत आहे. आम्ही (समांतर क्रांतीच्या माध्यमातून) एकदा शाळेला भेट दिली तेव्हा माधान्ह आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ताटात अन्नापेक्षा माशांच अधिक आढळून आल्या. ही बाब येथील नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे प्रकर्षाने मांडली. माशांसह हवा आणि पाणी प्रदूषणाने गाव उध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले असतांना क्वालिटीच्या भांडवलदार मालकांनी पुन्हा नव्याने नवे प्रकल्प उभे करण्याचे षड्यंत्र सुरू ठेवले आहे.
या प्रकल्पाविरोधात मुठभर गाव कसोशीने, जिद्दीने लढा देत आहेत. पण, मुके – बहिरे प्रशासन या लोकांच्या भावनांची कदरच करायला तयार नाही. स्थानिक पातळीवर गावकरी वगळता इतर कुणीच तालुकावासीय याविरोध ब्र काढायला तयार नाहीत. अर्थातच, गावकरी करतात तो पैशाने सगळ्यांची तोंडं बंद झाली हा आरोप खरा ठरला आहे.

अलिकडेच केंद्रीय प्रदूषण महामंडळानेदेखील हा प्रकल्प बंद करण्याची सूचना केली होती. त्यात आता ३१ जानेवारी रोजी पुन्हा या प्रकल्पाबद्दल मंडळाच्या संमतीशिवाय प्रकल्प चालविला जात असल्याचे व प्रकल्प बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका कार्यालयातून चेंडू दुसऱ्या कार्यालयात टोलवला जात असून या भांडवलदार क्वालिटी प्रकल्प मालकांना प्रशासकीय आणि राजकीय अभय मिळाले असल्याचे लपून राहिलेले नाही. अधिकारी आदेशांचे पालन करीत केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गावकऱ्यांनी मात्र प्रकल्प बंद करण्याचा निर्धार कायम ठेवत लढा चालविला आहे. लोंढ्यात असाच एक अवैद्य प्रकल्प लोकांच्या जिवावर उठला होता. तेव्हा अनेक प्रयत्नानंतर लोकांनी अक्षरश: प्रकल्पावर दगडफेक करून पळवून लावले होते. कौलापूर वाडा येथील नागरीकांना ही भूमिका घेण्यास भाग पाडू नये अशी आपेक्षा आता येथील तरूण वर्ग व्यक्त करीत असून राजकारण्यांनी आणि प्रशासनकर्त्यांनी वेळीच त्यांच्या कायदेशीर आंदोलनाची- मागणीची दखल घेणे गरजेचे आहे.

रणजीत पाटील गटाचा एकतर्फी विजय; अध्यक्षपदी सुनील पाटील
समांतर क्रांती / नंदगड हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून […]