काही माणसं ठिणगीसारखी असतात. अगदीच बेदखल. पण त्यांचा वनवा पेटला की, प्रत्येक घटकाला त्याची दखल घ्यावी लागते. मन्नूर गावचे उद्योजक श्री. आर. एम.चौगुले यांच्या विचारांचा आणि प्रसिद्धीचा वनवा आता संपूर्ण बेळगाव तालुक्यात पसरला आहे. मितभाषी, लाघवी आणि आजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी तळागाळातील माणसात मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यांना आभाळभर शुभेच्छा.
राजू उर्फ आर.एम. यांनी घेतलेले कष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून जातात. शेतकरी कुटुंबात जमलेले आर.एम. पुढे उद्योजक वगैरे होतील असे कुणालाही वाटले नव्हते. गवंडी ते शेतकरी आणि उद्योजक हा त्यांचा थरारक प्रवास अचंबित करणारा आहे. सिव्हिलचा डिप्लोमा करून छोटी मोती काम मिळवीत. अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सुरवातीला आर.एम.चौगले असोसिएट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ही फर्म सुरू केली. त्यानंतर त्याचे रूपांतर वननेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्ये केले. घरात सुख समाधान आले. आता वेळ होती ती समाजाकडे लक्ष देण्याची. त्यांनी स्वतःला समाजकार्यात गुंतविले.
मराठीच्या अन्यायाविरोधात लहानपणापासून मनात दाबून ठेवलेली चीड ते आपल्या कार्यातून व्यक्त करू लागले.
महाराष्ट्र एकीकरण समितीशी त्यांची नाळ जोडली गेली असल्यामुळे त्यांनी तरुणांच्या संघटनात्मक कार्यात लक्ष घातले. एस.एल.चौगुले याना जिल्हा पंचायतीपर्यंत पोहचविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. समितीच्या मोर्चे, आंदोलने, महामेळावा, महाराष्ट्रातील आंदोलने यामध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले. त्यातून तरुणांनी त्यांना आपला नेता बनविले.
व्यवसायात नेहमीच व्यग्र असणारे आर. एम. यांनी आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून स्वतःला समाजकार्यतही झोकून दिले. आज बेळगाव ग्रामीण मतदार संघात असे अनेक लोक भेटतील, जे त्यांच्या कार्याची तोंड भरून कौतुक करतात. अडल्या नडल्याला आर्थिक मदत करताना ते आपल्या बालपणात हरवतात. आपल्या वाट्याला जे कष्ट आले ते इतरांच्या येऊ नयेत.या भावनेतून त्यांनी शेकडो विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांना मदत केली आहे. आपण घेतलेला वसा टाकायचा नाही, यासाठी ते नेहमीच तळमळत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू म्हणजे लाघवी बोलणे आणि आजातशत्रू स्वभाव. त्यामुळेच हा माणूस जनसामान्यांत राजसारखा वावरत असतो.
मराठी भाषा संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका वाढत असल्याने बेळगाव ग्रामिणमधील तरुणांनी यावेळी त्यांना समितीने उमेदवारी द्यावी, यासाठी तगादा लावला आहे. यथावकाश त्यांनाच उमेदवारी मिळेल यात शंका नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सरदेसाई-दळवी यांचे खानापूर म.ए. समितीकडे अर्ज
खानापूर: युवा नेते निरंजन सरदेसाई आणि जेष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज गुरुवारी म.ए. समितीकडे अर्ज दाखल केले. अध्यक्ष गोपाळ देसाई आणि कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदकप्राप्त आबासाहेब दळवी यांनी समितीकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर निरंजन सरदेसाई यांनी त्यांचा अर्ज अध्यक्षांकडे सुपूर्द […]