बंगळूर: येत्या २४ तासात राज्यातील १२ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हिंदी महासागरातील वेगवान हालचालीमुळे वातावरणात कमालीची आर्द्रता तयार झाल्याचा हा परिणाम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या काळात ताशी ३० ते ४० कि. मी. वेगाने वारे वाहणार आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातदेखील हा पाऊस बरसणार आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.
खानापूर नगर पंचायतीचा कारभार;'दिव्याखाली अंधार'
खानापूर: येथील नगर पंचायत नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. कार्यालयाच्या समोरच शाहूनगर ही डोंबारी वसाहत आहे. तेथील अनियमित पाणी पुरावठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, मात्र त्याची चिंता कुणालाच नाही. नगर पंचायत कार्यालयासमोरील जलकुंभाला कधीच पाणी येत नाही, अशी या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.नगर पंचायत कार्यालयाच्या समोर काही वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. शाहूनगरमधील लोकांची […]