खानापूर: आज शनिवारी सकाळीच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. एरवी, सायंकाळी ढग दाटून येत होते. मात्र आठच्या सुमरास अचानक आभाळ ढगांनी भरून निघाले आणि कांही क्षणातच पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील नंदगड भागातदेखील पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी एवढ्या पावसाने शिवारात मशागतीची कामे होणार नाहीत. शेतकऱ्याना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने ही आपेक्षा फलद्रूप होईल, असे शेतकऱ्यांना वाटते.
डॉ. निंबाळकरांचा पूर्व भागात उद्या प्रचार
खानापूर: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारत डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या रविवारी (ता. २१) पूर्व भागासह करंबळ येथे प्रचार दौरा आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी तोलगी, गंदिगवाड, सुरपूर-केरवाड, कक्केरी यासह सायंकाळी करंबळ येथे प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम असा.. सकाळी ९.३० वाजता – तोलगी सकाळी १०.३० वाजता – गंदिगवाड दुपारी १२ वाजता – सुरपूर-केरवाड दुपारी […]