खानापूर: गेल्या आठ दिवसांपासून सायंकाळी आभाळ दाटून येत होते. कांही काळ विजांचा कटकडाटही होत असे. पण, चातकाप्रमाणेच पावसाची वाट पाहणाऱ्या खानापूरकरांना हुलकावणी दिली होती. इतर ठिकाणी पाऊस पडल्याच्या बातम्यांनी खानापूरकर अस्वस्थ झाला असतांनाच आज दुपारी तीनच्या सुमारास अखेर घननीळ बरसला.
वाढता उष्मा, तळ गाठलेले नदी-नाले आणि विहीरी, ओला चारा मिळत नसल्याने पोट खपाटीला गेलेली जनावरे, करपत चाललेली पिके यामुळे तालुकावासीय पुरते हवालदिल झाले आहेत. जोराच्या अवकाळी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या तालुकावासीयांना गेल्या आठवड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण, शहर आणि परिसरात मात्र पावसाचा थेंबसुध्दा पडला नव्हता.
आज गुरूवारी (ता.१८) दुपारी तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. अर्धा झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी लहान डबकी साचलेली पहावयास मिळाली. तर अनाहूतपणे पाऊस सुरू झाल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र बाझार पेठेत होते. कांही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता, पण पुन्हा तासाभराने उष्म्याने लाहीलाही सुरू झाली. आता तालुक्याला दमदार पावसाची आपेक्षा आहे.
अंजलीताईच पश्चिम भागाच्या समस्या मार्गी लावतील
ॲड.ईश्वर घाडी; कणकुंबीत डॉ. अंजली निंबळकरांचे जंगी स्वागत जांबोटी: तालुक्याचा पश्चिम भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न व्हायला हवेत. परंतु, गेल्या ३० वर्षात भाजपच्या खासदारांनी केवळ खुर्ची गरम केली. ते पाच वर्षातून एकदा केवळ मते मागायला येत होते. त्यामुळे हा भाग दुर्गम राहिला आहे. यावेळेला आपल्या तालुक्यातील डॉ. अंजलीताईंना काँग्रेसने […]