खानापूर: शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. कांही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता, पण पुन्हा उष्णता वाढली. दुसऱ्यांदा आज शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
गतवर्षी पावसाने हात दिला होता. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांत मुबलक पाणी साठा होऊ शकला नव्हता. सध्या सर्वच नदी-नाल्यात ठणठणाट आहे. अंतरजल पातळीतदेखील कमालाची घट झाली आहे. अशा स्थिती शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिनाभरापासून आवकाळीची आपेक्षा होती पण, पाऊस वाकुल्या दाखवीत होता.
दोन आठवड्यांपूर्वी सरी कोसळल्या होत्या, त्यानंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरूवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दमदार पाऊस न झाल्यास मात्र मशागतीची कामे रेंगाळणार आहेत. शिवाय धुळवाफ पेरणीचे संकट ओढवणार आहे. हवामान खात्याने यावेळी वेळेत आणि मुबलक पावसाची शक्यता वर्तविली आहे.
क्रुझर पलटी होऊन तीन महिला ठार
जत्त: समोरील टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने घडलेल्या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. महाराष्ट्रात कामाला निघालेल्या अथनीच्या महिलांवर काळाने घातला. ही घटना जत्तजवळ घडली असून या अपघातात अन्य दहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघातात महादेवी चौगुला, गिता दोडमनी, कस्तुरी (तिघीही रा. बळ्ळीगेरी, ता.अथणी) या ठार झाल्या. टायर फुटल्यानंतर क्रुझरने चारवेळा पटली घेत रस्त्याच्या […]