खानापूर: हलकर्णी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि खानापूर तालुका पंचायतीचे माजी सभापती श्री रामचंद्र गुंडूराव चौगुले (वय 75) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी आठच्या सुमारास निधन झाले. दुपारी 2 वाजता हलकर्णी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मानजवळच्या धबधब्यात तरुण बुडल्याची भीती
समांतर क्रांती वृत्तखानापूर: तालुक्यातील मान येथील शिंबोली धबधब्यात तरुण बुडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन तरुण धबधबा बघायला गेले होते. धबधब्याच्या डोहात पोहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो तरुण बुडल्याचे सांगितले जात आहे. शोध मोहीम सुरू आहे. तरुणाबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.