
बेळगाव: रंगपंचमीने रंगाने बेरंग केल्याच्या घटना काल जिल्ह्यातील दोन ठिकाणी घडल्या. यात घटनांत तीन चिमुकल्या शाळकरी मुलांना जीव गमवावा लागल्याने नको ती रंगपंचमी असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.
चिकोडीजवळील एकसंबा येथे रंगपंचमीनंतर विहिरीत पोहण्यास गेलेल्या वेदांत हिरकोडी (११) व मनोज कल्याणी (९) या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तर चिकोडी जवळीलच बारवाड येथे रंग खेळताना अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने प्रज्वल बाळासाहेब पाटील (११) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला.
दोन्ही घटनांत ऐन शिमग्यात त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी उपाय योजले गेले पाहिजेत, अशी ओरड आता होऊ लागली असली तरी सण-उत्सवांचे बदलते स्वरूप याला कारणीभूत असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

क्वालिटी पोल्ट्रीला अभय का? प्रदूशन महामंडळाला पुळका का?
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट कौलापूर वाडा हे गाव नक्कीच खानापूर तालुक्यात किंवा लोकशाहीवादी भारत देशात आहे का? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गवळ्यांच्यावाड्यात सर्रास दिसतात ते गुरांचे गोठे. त्यामुळे माशांचा, डासांचा प्रादूर्भाव वाढून रोगराईने माणस मरूनच जातील, अशी स्थिती दिसत असली तरी प्रत्येक गवळीवाड्यावरील स्वच्छता अशी असते ही गोठ्यातही एकाद्याचे मन […]