खानापूर तालुक्यातील राशन घोटाळा लवकरच काही तासांत उघड करणार : सुर्यकांत कुलकर्णी ( पंचहमी योजना अध्यक्ष ) यांनी असा इशारा दिला आहे.
गोर गरीब जनतेचा तांदूळ कोण गायब करतयं ? कसा गायबं करतात ? कोण कोण सामील आहे ?सगळ्या भानगडी बाहेर काढणार, असे ते म्हणाले.
गेले अनेक वर्ष दरमहा लाखो रुपयांचा राशन मधे भ्रष्टाचार चालू आहे … गोर गरीब सामान्यांची लूट चालू असल्याचे सुर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले आहॆ.

मणतुर्गे येथे आनंदोत्सव
मणतुर्गे तालुका खानापूर येथे गुढीपाडवा निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. आबासाहेब नारायणराव दळवी अध्यक्ष श्री रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार […]