समांतर क्रांती / खानापूर
Relief for those injured in bear attack; अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले मान येथील सखाराम महादेव गावकर यांना आज बुधवारी (ता.१८) वनखात्याकडून १० लाखांच्या मदत निधी सुपूर्द करण्यात आला. जखमींना एवढ्या रक्कमेचा निधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावकर कुटुंबीयांची परवड चालली होती. यासंदर्भात काँग्रेसने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. माजी आमदार आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सचीव डॉ. अंजली निंबाळकर यांनी वनमंत्री ईश्वर खांड्रे यांच्याकडे जखमींची कैफीयत मांडल्यानंतर तातडीने ही कार्यवाही करण्यात आली.
मान येथील सखाराम गावकर यांच्यावर शेतात काम करीत असतांना अस्वलाने हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा पाय निकामी झाला आहे. पण, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुसेशे पैसे नसल्याने त्यांची उपचाराऐवजी परवड चालली होती. याकडे वन खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी गावकर कुटुंबीयांच. भेट घेऊन आर्थिक मदत केली होती. तसेच वनखात्याने विनाविलंब मदतनिधी द्यावा, अशीमागणी लावून धरली होती. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी काल मंगळवारी (ता.१७) वनमंत्री ईश्वर खांड्रे यांच्याशी संपर्क साधून खानापूर तालुक्यातील समस्यांबाबत चर्चा केली. तसेच जखमी सखाराम यांचीही कैफीयत मांडली.
ना. खांड्रे यांनी तात्काळ दखल घेत आज गावकर यांच्या पत्नीकडे रु. १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला १० लाखांचा निधी देण्याची ह. पहिलीच वेळ आहे. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सदस्य महादेव कोळी, ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, जांबोटी भागातील कार्यकर्ते दिपक कवठणकर उपस्थित होते.
सवदी बरळले.. म्हणे मुंबई केंद्रशासीत करा!
समांतर क्रांती / बेळगाव बेळगाव नव्हे, मुंबईलाच केंद्रशासीत करावे, अशी मागणी करीत अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आकलेचे तारे तोडले. यापूर्वीही त्यांनी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना मराठीतून बोलण्यास विरोध करीत मराठी विरोधी गरळ ओकली होती. बेळगावमधील लोकांनी मुंबई विधानसभेत प्रतिनिधीत्व केले असल्याने मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी मुक्ताफळे आमदार सवदींनी उधळली. महाराष्ट्रातील नेते बेळगाववर […]