समांतर क्रांती / बेळगाव
केवायसी नियमावलीचे उल्लंघन आणि आणि कर्ज वितरण नियमांचे उलंघन केलेल्या देशातील चार बँकांवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात बेळगावच्या एका बँकेचा समावेश आहे.
देशातील चार प्रत्येकी ५० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तर पुण्यातील जनता बँकेला १७.५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील १० बँकांचे परवाने रिझर्व्ह बँकेने रद्द केले आहेत.
बेळगावातील बेळगाव जिल्हा महसूल नोकर सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने दणका दिला आहे. त्याशिवाय तेलंगाणमधील इंडियन स्कूल फायनान्स कंपनी, तमिळनाडूतील बटगोंडू सहकारी अर्बन बॅंक आणि शिवकाशी सहकारी अर्बन बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. व्यवहारात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा या बँकाना देण्यात आला आहे.
चोर्ला घाट: आठ दिवसांपूर्वी अपघात; आज वाहतूक कोंडी
समांतर क्रांती / चोर्ला चोर्ला घाटात आज शनिवारी (ता.११) दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. घाटात वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास प्रवाशांना वाहनातच ताटकळत बसावे लागले. दरम्यान, भीषण अपघात घडल्याची अफवा पसरल्यामुळे अनेकांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला. प्रत्यक्षात मात्र मागील शनिवारी (ता.५) झालेला अपघातग्रस्त ट्रक दरीतून बाहेर काढतांना ही […]