समांतर क्रांती वृत्त
खानापूर: शेतीत चिखल करतांना ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तिओली येथे घडली आहे. या घटनेत वर्षभरापूर्वीच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झालेले पांडुरंग लाटगावकर यांचा मृत्यू झाला असून या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, सध्या तालुक्यात भात लागवडीची धांदल सुरू आहे. तिओली येथील सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग लाटगावकर (वय ६१) हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवित असतांना अचानक ट्रॅक्टर उलटल्याने ते त्याखाली सापडले. त्यात ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटीलआणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सावधान! दुसऱ्याच दिवसापासून वाहन चालकांची लूट सुरू
समांतर क्रांती वृत्त खानापूर: भरपूर गाजावाजा करीत गणेबैल येथील टोल नाक्यावर वसुली सुरू झाली असून दुसऱ्याच दिवसापासून वाहन चालकांच्या लुटीची चर्चा आहे. तसेच मासिक पास देण्याविषयीही संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे टोल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केवळ एकेरी टोल आकारला जात असून त्याचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचे समजते. याबाबत तक्रार करणाऱ्यांशी कर्मचारी हमरीतुमरी करीत आहेत. […]