आर.एम.चौगुले यांनाच जनमत
बेळगाव: बेळगाव ग्रामीण मतदार संघातून युवा नेते आर.एम.चौगुले याना महिला आणि तरुणांचा खंबीर पाठिंबा आहे. समितीने जनमताचा कौल घेऊन उमेदवार निवडणार असल्याचे घोषित केले आहे. सध्या आर.एम.चौगुले यांनाच मतदारांची पसंती असून त्यांना उमेदवारी देण्याबाबतची आग्रही भूमिका मतदारांनी विशेषतः तरुणांनी घेतली आहे. त्यांना उमेदवारी न दिल्यास तरुण बंडखोरी करतील, असा अंदाज असल्याने समिती नेत्यांसमोर आर.एम.चौगुले यांच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
गेल्या १५ वर्षांपासून चौगुले समिती कार्यरत आहेत. आजातशत्रू, निस्वार्थ राजकारण, मराठीचा शिलेदार आणि वंचितांचा आधार या भूमिकेतून त्यांचे कार्य चालले असून त्यामुळे यावेळी त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी मतदारांनी लावून धरली आहे. सुशिक्षित आणि जाणकार उमेदवार म्हणून त्यांना जनमत आहे. समितीने जनमताचा कौल लक्षात घेऊन उमेदवार निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. चौगुले यांना मिळणार प्रतिसाद पाहता समितीकडून यावेळी उमेदवार निवडीत कोणतीही चूक होणार नसल्याची आशा मतदारांना आहे.
आर.एम.चौगुले हे एकमेव असे उमेदवार आहेत, जे सद्यस्थितीत विरोधकांना टक्कर देऊ शकतात. कारण, ते निष्कलंक राजकारणी आहेत. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप मतदारांवर आहे. त्यासाठी समिती नेते आणि निवड समितीने आर.एम.चौगुले यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे. समितीकडे पाच जणांना इच्छा प्रदर्शित केली आहे. पण, नवा आणि तरुण चेहराच ग्रामीण मतदार संघातील चित्र पालटून पुन्हा समितीचा भगवा फडकवू शकतो, याचा विचार नेत्यांनी करावा, अशी रास्त मागणी होत आहे.
आर.एम.चौगुले ग्रामीणचे उमेदवार; गुलाल उधळणार
बेळगाव: संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून आर . एम. चौगुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता म. ए. समितीच्या विजयासाठी मराठी बांधवांनी संघटित होऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण मतदारसंघामध्ये म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी 5 जणांनी अर्ज दाखल […]