बेळगाव: ग्रामीण मतदार संघात सध्या आर.एम. नावाचं वाढलं घोंघावत आहे. त्यांना गावागावातून मिळणारा पाठिंबा आणि स्वयंस्फूर्तीने दिली जाणारी दाद पाहता मतदानाआधीच त्यांच्या विजयाची नांदी सुरेल झाली आहे.
सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि धडाडीमुळे आपला माणूस म्हणून आर.एम.चौगुले यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. विविध कार्यक्रमांसाठी ते गावागावात फिरत आहेत. प्रत्येक गावात नागरिक, तरुण आणि महिला त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत. ज्या गावात जातील तेथे फेटा बांधून त्यांचे स्वागत केले जात आहे. शेकडोच्या संख्येने मतदार त्यांना घेराव घालून साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी मनापासून ग्वाही देत आहेत. गावपंच संपूर्ण गावाच्या पाठिंब्याची घोषणा करीत आहेत. तरुणांचं तर आधीच ठरलंय, ‘यावेळी ग्रामिणमध्ये फडकणार तर भागवाच.’
आर.एम.यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांची तंतरली आहे. संयुक्त महाराष्ट्र आणि मराठी भाषा-संस्कृती संरक्षण आणि संवर्धनाचा ध्यास घेऊन आपण निवडणूक रिंगणात आहोत, मला राजकारण करायचे नाही.तर समाजकारण आणि मराठी भाषिकांवरील अन्यायाविरुद्ध लढायचे आहे, असे आर.एम.चौगुले यांचे मत आहे. नांदी तर झालीच आहे, 10 मेची भैरविही सुरेल असेल, अशी आशा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
के.पी.पाटलांचा आडमुठेपणा;शिवसेना मुरलीधर पाटलांच्या पाठीशी
खानापूर: स्वत:स शिवसेनेचे उमेदवार म्हणवून घेणारे के.पी.पाटील यांचा सेनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी आणि जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी सेनेचा समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठींबा असून शिवसैनिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, आवाहन केले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्प्न पूर्ण होर्इपर्यंत सीमाभागात सेना […]