
समांतर क्रांती / विशेष
खानापूर तालुक्याच्या विकासाचे ढोल वाजविणाऱ्या नेत्यांसनसनीत चपराक देणारी रस्त्यांच्या दुरवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. तालुक्यात आजघडीला तब्बल १५२. ४० कि.मी. अंतराचे रस्ते कच्चे आहेत.
रस्त्यांचा विकास केल्याचा डांगोरा पिटत सत्तेची पोळी चाखणाऱ्यांनी केवळ रस्त्यांच्या चिखलात लोळण्याव्यतिरिक्त कांहीच केले नाही, याची प्रचिती देणारी शासकीय आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा पंचायतीकडून दर दहा वर्षांनी प्रकाशीत होणाऱ्या अहवालात तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करणारी ही आकडेवारी आहे.
२६० गावांनी व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या हद्दीत २६७.१० कि.मी.. रस्ता येतो, त्यातील १५२.४० कि.मी.चे रस्ते अजुनही कच्चे आणि धुळमातीचे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अद्यापही याच रस्त्यावरून पायपीट करावी लागते. ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्यांना लाज आणणारी बाब आहे.
तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात १५२.४५ कि.मी. अंतराचे रस्ते येतात तर १७६.७८ कि.मी.जिल्हा मार्ग म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांना जोडणारा मार्ग आहे. २२२.३२ कि.मी. अंतराचा मार्ग हा राज्य महामार्ग आहे. त्यात गोव्याला जोडणारा चोर्ला महामार्ग, ताळगुप्पा महामार्ग यांचा समावेश आहे. केवळ ४५ कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचा समावेश खानापूर तालुक्याच्या हद्दीत आहे.
१५२.४५ कि.मी. रस्त्याची जबाबदारी जिल्हा पंचायतीकडे आहे तर २६७.१० कि.मी. रस्त्याचा ठेका तालुका पंचायतीकडे आहे. त्यातील केवळ ११५.१० कि.मी. रस्त्यांचाच विकास आजवर झाला आहे. एकंदरच काय रस्ता केला म्हणजे विकास केला अशी संकुचीत वृत्ती असणाऱ्या तालुक्यातील नेत्यांना या रस्त्यांचाही योग्यरितीने विकास करता आलेला नाही, हेच यावरून दिसून येते.

रस्ता विकासाच्या कामांचा शुभारंभ केल्यानंतरही अनेक कामे झालेली नाहीत. जी झाली त्यांची धुळधान उडाली असून त्यांच्या चौकशी मागणीदेखील कोणत्याही पक्षाने केलेली नाही. कारण, सगळ्यांनीच रस्त्यांच्या धुळीत आणि चिखलात लोळून त्यांची औकात दाखवून दिली आहे. त्यामुळे अनेक गावांना आजही व्यवस्थतीत रस्ते नाहीत. जेथे रस्ते आनेत, ते नावापुरतेच असून त्यांची दयनीय आवस्था आहे.
कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणल्याच्या घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना तालुक्यातील रस्त्यांची संख्या आणि अंतराची आकडेवारी तरी माहिती असेल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे दररोज लोकप्रतिनिधींच्या नावांने लाखोल्या वाहिल्या जात असतांनाही निधीचा अभाव या एकाच उत्तराने या प्रकरणावर सोयीस्कर पडदा टाकला जात आहे.

तेलगी घोटाळ्यात कुणी राजिनामा दिला होता?
समांतर क्रांती / विशेष महाराष्ट्र राज्याला हादरा दिलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. आतापर्यंत किती मंत्र्यांनी आणिबाणीच्या काळात राजिनामे दिले. विशेषत: खानापूरशी संबंधीत तेलगी घोटाळ्यात (बनावट स्टँप) कुणाला राजिनामा द्यावा लागला होता? उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होणारा हा नेता कोण होता? संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून […]