जांबोटी: चोर्ला महामार्ग दुरुस्तीला विलंब होत असल्याने आज कणकुंबी येथे रास्ता रोको करून चक्काजाम करण्यात आला. परिणामी, तब्बल तीन तास या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार गायकवाड यांनी रस्ता दगडुजीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अरविंद पाटील यांनी केले. त्यांनी रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पुन्हा आंदोलन करू असा दम तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिला. यावेळी कणकुंबी भागातील नागरिक उपस्थित होते.
Kudos to the author for delivering such an informative piece. Thanks for sharing your knowledge!