बेंगळुरू: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने (जेएसी) ३१ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी भेट घेऊन २००० कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद करण्यास सहमती दर्शविल्यानंतर संयुक्त कृती समितीने संपचा निर्णय मागे घेतला आहे. बस सुरू राहणार आहेत.
एआयटीयूसीशी संलग्न केएसआरटीसी कर्मचारी आणि कामगार महासंघाने इतर पाच परिवहन संघटनांच्या समर्थनासह, विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनाची थकबाकी निकाली काढावी, ही प्रमुख मागणी होती.
फेडरेशनचे अध्यक्ष एचव्ही अनंता सुब्बा राव म्हणाले की, त्यांच्या विविध मागण्यांसाठी संक्रांतीच्या सणानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “परिवहन संघटनांनी सरकारकडे त्यांच्या १३ मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांबाबत त्यांना अवगत केले आहे. २००० कोटी रुपये जारी करण्याची विनंती देखील केली आहे. ”
रेड्डी यांनी मागील भाजप सरकारने चार बस महामंडळांना आर्थिक संकटात ढकलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “भाजप सरकारने ५,९०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बस महामंडळांवर सोडले आणि कोणतीही भरती झाली नाही आणि नवीन बसही जोडल्या गेल्या नाहीत. आम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र आम्ही १० हजार लोकांची भरती केली आणि ४ हजार ३०० बसेस सुरू केल्या,”असे ते म्हणाले.
लैला शुगर्सकडून ३००० रुपये पहिला हप्ता
समांतर क्रांती / खानापूर लैला शुगर्सने यंदा ऊसाला प्रतिटन ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. तसेच मागील गळीर हंगामातील थकीत ५० रुपये प्रतिटन हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती लैला शुगर्सचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. लैला शुगर्सने यंदा दोन बॉयलर बसवून दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने ऊस गाळपाला एक महिना उशिर […]